‘गली बॉय’ फेम रॅपर ​​धर्मेश परमारचे निधन

‘गली बॉय’ फेम रॅपर ​​धर्मेश परमारचे निधन

‘गली बॉय’ फेम रॅपर धर्मेश परमार उर्फ ​​एमसी तोडफोड याचे आज निधन झाले. आतापर्यंत त्यांच्या मृत्यूचे खरे कारण काय आहे याचा तपास सुरू आहे. मात्र अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये त्याला कार अपघातात जीव गमवावा लागल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्या ‘स्वदेशी मूव्हमेंट’ या बँडने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना त्यांच्या निधनाची माहिती दिली आहे.

धर्मेशच्या शेवटच्या कामगिरीचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत बँडने ही दुःखद बातमी सांगितली आहे. फक्त २४ वर्षाच्या धर्मेश परमारच्या निधनाने त्याच्या चाहत्यांमध्ये खळबळ माजली आहे. तर ‘गली बॉय’ चित्रपटात त्याने एक रॅप गायले होते. त्यावेळी त्या चित्रपटाचे लीड हिरो रणवीर सिंग आणि सिद्धांत चतुर्वेदी यांनी त्याचे कौतुक केले होते. आज त्याच्या निधनाने या दोन्ही कलाकारांना मोठा धक्का बसला आहे. सोशल मीडियावर त्यांनी या रॅपरला श्रद्धांजली वहिली आहे.

गली बॉय चित्रपटातील इंडिया 91 या गाण्याला धर्मेशने आवाज दिला होता. या गाण्यानंतर तो प्रसिद्धीच्या झोतात आला होता. या गाण्यामुळे त्याने लोकांच्या हृदयात खास स्थान निर्माण केले होते.

हे ही वाचा:

पंतप्रधान नरेंद्र मोदींही त्यांच्यापुढे झाले नतमस्तक

कंभोज यांच्या घराकडे आता पालिकेची वक्रदृष्टी

अनिल देशमुख यांचा राजीनामा घेणे ही चूक!

कृषी कायदे मागे घेतल्याने शेतकऱ्यांचे झाले मोठे नुकसान!

धर्मेश परमार हा मुंबईतील सर्वसामान्य कुटुंबात जन्माला आला होता. मुंबईच्या एका चाळीत तो राहायचा आणि येथूनच त्याने रॅपर बनण्यास सुरुवात केली. धर्मेशच्या रॅपरची विशेषता म्हणजे तो त्याच्या रॅपर मधून लोकांची विचारसरणी समोर आणत असे. लोक त्याला क्रांतिकारी रॅपर या नावानेही ओळखतात.

Exit mobile version