अपेक्षेप्रमाणे भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांची मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे. त्यांनी आपल्या मंत्रीपदाची हॅट्रिक केली आहे.सामान्य कार्यकर्ते, विधान परिषदेचे सदस्य, विधान परिषदेतील विरोधीपक्ष नेते, भाजपचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष, सलग तिसऱ्यांदा नागपूरचे खासदार आणि आता सलग तिसऱ्यांदा केंद्रीय मंत्री असा नितीन गडकरी यांचा राजकीय प्रवास आहे.
हे ही वाचा:
बुलढाण्याला जिल्ह्याला २२ वर्षांनी मंत्रीपद !
आमच्या मनात वेगळं काही नाही, आम्ही एनडीएसोबतच!
२६ मे २०१४ ला त्यांनी प्रथम केंद्रीय कॅबिेनेट मंत्री म्हणून शपथ घेतली होती. भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्रालयाचा कार्यभार त्यांनी स्वीकारला. होता २०१९ ते २०२४ या काळातही त्यांच्याकडे भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाचाच कार्यभार होता. महाराष्ट्रात १९९५-१९९९ या काळात भा.ज.प.-शिवसेना युतीचे सरकार सत्तेत असताना ते सार्वजनिक बांधकाम मंत्री होते. २००९ साली त्यांची भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड झाल्यावर पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडले गेलेले ते दुसरे मराठी नेते ठरलेत.