केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरात प्रवास करताना आपल्या बुलेटप्रूफ गाडीला रामराम केला आहे. “नागपूर शहराला स्वच्छ, हरित, सुंदर ठेवण्यासाठी इंधनाच्या कार वापरणार नाही.” असं म्हणत नितीन गडकरी यांनी इलेक्ट्रिक कार वापरायला सुरुवात केलीय.
गडकरी जेव्हा नागपुरात असतील तेव्हा तेव्हा ते पांरपारिक इंधनावर चालणाऱ्या कारऐवजी इलेक्ट्रिक कार वापरतात. शहरातील प्रदूषण कमी करण्यासाठी इंधन वाहनांचे प्रमाण कमी करणे गरजेचे आहे. याला पर्याय म्हणुन इलेक्ट्रिक वाहनांकडे बघितले जात आहे. त्यामुळेच इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी गडकरींनी स्वत: इलेक्ट्रिक कार वापरायला सुरुवात केली आहे.
हे ही वाचा:
भारतात उभा राहणार ओलाचा सर्वात मोठा इलेक्ट्रिक स्कुटर कारखाना
भविष्यात इथेनॉल, बायोडिझेल, इलेक्ट्रिक, बायोफ्यूएल, हायड्रोफ्युएल हे या देशाचे इंधन व्हावे. त्याचाच एक भाग म्हणून बुलेटप्रुफ गाडी सोडून नागपुरात इलेक्ट्रिक गाडी वापरत असल्याचे नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले.
केंद्र सरकारने जुनी वाहने भंगारात काढण्यासाठी आखलेल्या व्हेईकल स्क्रॅप्रिंग धोरणामुळे ग्राहकांना एक मोठा फायदा होणार आहे. या धोरणानुसार तुम्ही तुमची जुनी गाडी भंगारात देऊन नवी गाडी खरेदी केली तर तुम्हाला नव्या कारच्या खरेदीवर ५ टक्के सूट (Car discount) मिळेल. केंद्रीय भूपृष्ठ आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी ही माहिती दिली.