23 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरविशेष४१ लाखांचं बक्षीस असणाऱ्या माओवादी जोडप्याचं गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण!

४१ लाखांचं बक्षीस असणाऱ्या माओवादी जोडप्याचं गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण!

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती

Google News Follow

Related

गडचिरोली जिल्ह्यात सर्वात प्रमुख माओवादी म्हणून समजल्या जाणाऱ्या माओवादी गिरिधरने आणि त्याच्या पत्नीने आज पोलिसांसमोर आतांसमर्पण केलं आहे. आत्मसमर्पण करणाऱ्या माओवादी गिरिधरवर २५ लाखांचं आणि त्याच्या पत्नीवर १६ लाखांचं बक्षीस होत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली. गडचिरोली दौऱ्यावर असताना उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते. तसेच आत्मसमर्पण करणाऱ्या जोडप्याचं उपमुख्यमंत्री फडणवीसांनी गळ्यात हार घालून स्वागत केलं आहे.

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, माओवादी गिरिधरने आणि त्याच्या पत्नीने आत्मसमर्पण केल्यामुळे माओवादींच्या चळवळीची कंबर ही पूर्णपणे गडचिरोली जिल्ह्यामध्ये मोडली गेली आहे. नक्षलवाद्यांनी एकतर आत्मसमर्पण करा अथवा परिस्थितीला सामोरे जावे लागेल याची जाणीव नक्षलवाद्यांना करून दिल्यामुळे हे प्रमुख आत्मसमर्पण झाले आहे, त्यामुळे गडचिरोली पोलिसांचे मी अभिनंदन करतो.

हे ही वाचा:

छोटा शकीलचा मेहुणा आरिफ शेखचा मृत्यू!

वाढवण, ग्रेट निकोबारच्या विरोधाचा बोलवता धनी कोण? कोणते हिंदी आहेत, चीनचे भाई भाई

ग्रेट निकोबारमधील मोदी सरकारच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे काँग्रेसच्या पोटात पोटशूळ

जम्मू-काश्मीरच्या उरीमध्ये चकमक, दोन दहशतवादी टिपले!

सी-६० दल, पोलीस दलातील अधिकाऱ्यांनी सातत्याने याठिकाणी केवळ माओवाद्यांचा सामना केला असा नाहीतर त्यासोबत एक सोशल आऊटरिच केलं. समाजाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत योजनांची माहिती पोहचवण्याचे काम यांनी केलं आहे. त्यामुळे सामान्य माणसाच्या मनामध्ये पोलीस आणि प्रशासनाबद्दल एक मोठी संवेदना जागृत झाली आहे. अशामुळे गावातील गावकरी माओवाद्यांना गावात थारा देत नाहीत आणि पोलिसांनी ते अधिक जवळचे मानतात हा एक महत्वाचा फरक असल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

ते पुढें म्हणाले, आत्मसमर्पण करणाऱ्या माओवाद्यांना आज आपण संविधानाची प्रत दिलेली आहे आणि अपेक्षा व्यक्त केली आहे की माओवादी संविधान मानत नाही. ज्यांनी आत्मसमर्पण केलं आहे त्यांनी संविधानरूप पुढचे जीवन जगतील, असे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा