गडचिरोली: नक्षलवाद्यांच्या समर्थकास पोलिसांकडून अटक!

महाराष्ट्र सरकारने १.५ लाख रुपयाचे बक्षीस केले होते जाहीर

गडचिरोली: नक्षलवाद्यांच्या समर्थकास पोलिसांकडून अटक!

गडचिरोली पोलिसांना मोठं यश मिळाले आहे.नक्षलवादी कारवायात सामील असणाऱ्या आणि नक्षलवाद्यांना इतर प्रकारची मदत करणाऱ्या समर्थकाच्या गडचिरोली पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.दिलीप मोतीराम पेंदाम (३४) असे अटक करण्यात आलेल्या नक्षलवाद्याचे नाव असून त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत.महाराष्ट्र शासनाकडून दिलीप या नक्षलवाद्यावर १.५ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, उपविभाग भामरागड हद्दीमध्ये उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना भामरागड गावात एक संशयित व्यक्ती वावरताना आढळून आला.पोलिसांनी या व्यक्तीची तपासणी केली असता माहिती मिळाली की, त्या व्यक्तीचे नाव दिलीप मोतीराम पेंदाम (३४), रा. नेलगुंडा, तह. भामरागड, जि. गडचिरोली असे आहे. याची सखोल चौकशी केली असता तो कट्टर माओवादी समर्थक व माओवाद्यांचे काम करणारा असल्याचे समोर आले.

हे ही वाचा:

वधूपक्षाकडून वधूचेच अपहरण, पाहुण्यांवर मिरची पावडर फेकली!

बारामतीत तुतारी घेतलेल्या माणसाविरुद्ध ‘तुतारी’

बँकॉकहून आलेल्या व्यक्तीच्या बॅगेत सापडले पिवळ्या जातीचे १० ॲनाकोंडा!

राजौरीत मशिदीच्या बाहेर दहशतवाद्यांचा गोळीबार; सैनिकाच्या भावाची गोळी झाडून हत्या!

गेल्या वर्षी २२ मार्च रोजी रोजी नेलगुंडा जंगल परिसरात एक क्लेमोर व दोन कुकर बॉम स्फोटके लावून सुरक्षा दलाच्या जवानांना जिवे ठार मारुन त्यांची शस्त्रास्त्र व दारुगोळा लुटण्याच्या कामात त्याचा सहभाग असल्याचे तपासात आढळून आले.तसेच याच्यावर अनेक गुन्हे दाखल असल्याचे उघड झाले.

माओवादी कारवायांमध्ये माओवाद्यांना मदत करणे, माओवाद्यांना राशन पुरवणे, गावातील लोकांना मिटींगसाठी जबरदस्तीने गोळा करणे, गैर कायद्याची मंडळी जमवून पोलीसांविरुध्द कट रचने, माओवादी सप्ताहामध्ये बॅनर लावणे, पत्रके टाकणे अशी कामे तो करीत असे.याला अटक केल्याने गडचिरोली पोलिसांना मोठे यश मिळाले आहे.महाराष्ट्र शासनाने दिलीप मोतीराम पेंदाम याच्या अटकेवर १.५ लाख रूपयाचे बक्षीस जाहीर केले होते.दरम्यान, पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी माओवाद्यांना माओवादाची हिंसक वाट सोडून आत्मसमर्पण करुन सन्मानाने जीवन जगण्याचे आवाहन केले आहे.

 

Exit mobile version