नक्षलवाद विरोधात पोलिसांचे ‘गडचिरोली फाइल्स’

नक्षलवाद विरोधात पोलिसांचे ‘गडचिरोली फाइल्स’

नक्षलवादाच्या विरोधात जनजागृती करण्यासाठी पोलिसांनी एक मोहीम हाती घेतली आहे. पोलिसांनी ‘गडचिरोली फाइल्स’ या शीर्षकाखाली एक कॉमिक स्ट्रिप सुरू केली आहे. या कॉमिक स्ट्रिपच्या माध्यमातून पूर्व महाराष्ट्रातील एका जिल्ह्यातील नक्षलग्रस्त क्षेत्राची वास्तविकता दर्शवण्यात आली आहे. गुरुवारी यातील पहिली स्ट्रिप मराठी, इंग्रजी आणि स्थानिक भाषा गोंडी यामध्ये हे प्रसिद्ध करण्यात आले.

कॉमिक स्ट्रिपमार्फत माओवाद्यांकडून लोकांचा कसा छळ केला जातो आणि ते या भागातील विकास कसे थांबवण्याचा प्रयत्न करतात या विषयावर भाष्य केले आहे, असे गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी सांगितले. ‘गडचिरोली फाइल्स’ या कॉमिक स्ट्रिपमधून गडचिरोली जिल्ह्यातील घडामोडींवर भाष्य करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे गोयल यांनी ‘पीटीआय’शी बोलताना सांगितले.

हे स्ट्रिप दर पंधरवड्याला सोशल मीडियावर ऑनलाइन प्रसिद्ध केले जाईल, असेही ते म्हणाले. कार्टूनच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचता येईल म्हणून हे माध्यम निवडल्याचेही ते म्हणाले. पोलिसांकडून समाजात चांगला संदेश जावा यासाठी प्रयत्न करत असून पोस्टर्स, बॅनर्स, पत्रिका अशा माध्यमांचा वापर करून ते जनजागृती करत आहेत.

हे ही वाचा:

तालिबानचे दारू’बॅन’; कालव्यात ओतले हजारो लीटर मद्य

मविआ सरकारच्या काळात चौथीच्या पुस्तकात इस्लामी शिकवण

मुस्लीम महिलांचा लिलाव करणाऱ्या ऍपमुळे खळबळ

आम्हाला जगू द्या, मारू नका! म्हणण्याची वेळ आली पुण्यातल्या शिवसेनेवर

पहिल्या स्ट्रिपमध्ये माओवादी हे एका शाळेजवळ जाऊन विद्यार्थ्याला विद्रोही चळवळीत सहभागी होण्यासाठी सांगत आहेत. विद्यार्थ्याने नकार दिल्यावर त्यांनी शाळा पेटवून दिल्याचे दाखवले आहे. हे या भागातील वास्तव आहे. असेच वास्तव या माध्यमातून दाखवण्यात येणार आहे.

Exit mobile version