बाबरपेक्षा स्मृती मानधना गब्बर

महिला प्रीमिअर लीग २०२३ च्या लिलावात सर्वात महागडी खेळाडू

बाबरपेक्षा स्मृती मानधना गब्बर

भारतीय संघाची स्टार फलंदाज स्मृती मानधना ही महिला प्रीमिअर लीग २०२३ च्या लिलावात सर्वात महागडी खेळाडू ठरली आहे. महिलांच्या या प्रीमियर लीगच्या पहिल्या लिलावात खेळाडूंवर भरपूर पैशांचा वर्षाव झाला आणि खेळाडू इतके श्रीमंत झाले की, पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमपेक्षा स्मृतीचा पगार दुप्पट झाला आहे. पाकचा कर्णधार बाबर आझम जगातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक. पाकिस्तान सुपर लीगमध्ये तो पेशावर झल्मीकडून  खेळतो आणि त्याला प्रत्येक हंगामात १.५० लाख डॉलर मिळतात. पाकिस्तानी रुपयानुसार ही रक्कम ३ कोटी ६० लाख इतकी होते. पण भारतीय रुपयात ही रक्कम मोजली तर ती दीड कोटींपेक्षा कमी आहे. महिला प्रीमियर लीगमध्ये ७ खेळाडूंना २ कोटी किंवा त्याहून अधिक रक्कम मिळाली आहे. बाबरच नव्हे, तर पाकिस्तानचा शाहिन शाह, मोहम्मद रिझवान, आफ्रिदी यांना पीएसअलमधून मिळणारा पगार २ कोटींपेक्षा कमीच आहे.

हेही वाचा :

पुलावामा हल्ल्यातील जवानांना देशभरातून श्रद्धांजली

बीबीसीच्या कर्मचाऱ्यांना फोन बंद ठेवण्याचे आदेश; आयकर खाते धडकले

काश्मीरच्या लिथियम साठ्यावर दहशतवाद्यांचा डोळा

महिलांच्या पहिल्या आयपीएल लिलावात स्मृती मानधनाची छाप पडली आहे. रॉयल चॅलेजर्स बंगळुरने मुंबई इंडियन्सला कडवी टक्कर देताना स्मृतीला ३.४० कोटींत आपल्या ताफ्यात करून घेतले. महिला लीगच्या २०२३ लिलावात सगळ्यात आधी स्मृतीवर बोली लावली गेली. मुंबई इंडियन्सने तिच्यासाठी ३ कोटी रुपयांपर्यंत बोली लावली. स्मृतीचा सध्याचा फॉर्म पाहता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू तिच्याकडे कप्तानपद सोपवण्याची शक्यता अधिक आहे. स्मृतीकडे ११२ टी-२० मॅचेस खेळण्याचा दांडगा अनुभव आहे. आतापर्यंत तिने २६५१ धावा केल्यात. टी-२०  इंटरनॅशनल मॅचमध्ये तिचा स्ट्राइक रेट १२३ पेक्षा अधिक आहे. तिने १५ हून अधिक अर्धशतके झळकावलीआहेत.

महिला प्रीमिअर लीगमध्ये महागडे खेळाडू

  • स्मृती मानधना (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु) – ३.४० कोटी
  • अँश्ली गार्डनर (गुजरात जायंट्स)           – ३.२० कोटी
  • नॅट सीव्हर (मुंबई इंडियन्स)                   – ३.२० कोटी
  • दीप्ती शर्मा (यूपी वॉरियर्स)                     – २.६० कोटी
  • जेमिमा रॉड्रिग्ज (दिल्ली कॅपिटल्स)        – २.२० कोटी
  • बेथ मूनी (गुजरात जायंट्स)                       – २ कोटी
  • शेफाली वर्मा (दिल्ली कॅपिटल्स)                  – २ कोटी
Exit mobile version