भारताच्या ‘RRR’ चित्रपटाने ब्राझीलच्या अध्यक्षांना केले मंत्रमुग्ध !

चित्रपटाचे दिग्दर्शक एसएस राजामौली यांनी मानले आभार

भारताच्या ‘RRR’ चित्रपटाने ब्राझीलच्या अध्यक्षांना केले मंत्रमुग्ध !

मार्च २०२२ मध्ये अभिनेता राम चरण आणि ज्युनियर NTR यांच्या अभिनयाने ऑस्कर-विजेता ठरलेला ‘RRR’ या चित्रपटाने भारतासह परदेशातही आपल्या अभिनयाची छाप उमटवली.G२० शिखर परिषदेसाठी उपस्थित असणारे ब्राझीलचे अध्यक्ष लुईझ इनासियो लुला दा सिल्वा यांनी ‘RRR’ चित्रपटात दाखविलेल्या विनोद आणि नृत्याच्या कामगिरीबद्दल त्यांचे कौतुक केले आहे.

राम चरण आणि ज्युनियर NTR स्टारर यांच्या ‘RRR’ चित्रपटाने गोल्डन ग्लोब्स आणि अकादमी अवॉर्ड यांसारखे सन्मान मिळवून देशाचा मान वाढवला.आता, भारतात होत असलेल्या G२० शिखर परिषदेत ब्राझीलचे अध्यक्ष लुईझ इनासियो लुला दा सिल्वा यांनी देखील चित्रपटातील कलाकारांचे अभिनंदन केले आहे.ते म्हणाले, ‘आरआरआर ‘ हा तीन तासांचा फिचर चित्रपट आहे तसेच चित्रपटात सुंदर नृत्यासह मजेदार दृश्ये आहेत. भारत आणि भारतीयांवर ब्रिटिशांच्या नियंत्रणावर सखोल टीका करणारा चित्रपट आहे. हा चित्रपट ब्लॉकबस्टर झाला पाहिजे असे मला मनापासून वाटते. जर कोणी मला चित्रपटाबद्दल विचारले तर मी त्यांना ‘रिव्हॉल्ट रिबेलियन अँड रिव्होल्यूशन’ हा तीन तासांचा चित्रपट पाहिला आहे का? असे विचारतो.कारण ‘RRR’ या चित्रपटाने मला मंत्रमुग्ध केले आहे त्यामुळे या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि कलाकारांचे मी अभिनंदन करतो.

हे ही वाचा:

ऋषी सुनक यांची पत्नीसह अक्षरधाम मंदिराला भेट !

आमदार रवींद्र वायकर यांनी तथ्य दडपले!

मिर्चीचा ठेचा आणि भाकरी ठाकरेंना पचेल काय ?

पोटनिवडणुकांत भाजपने दाखवली ताकद

‘RRR’चे दिग्दर्शक एसएस राजामौली यांनी यावर प्रतिक्रिया व्यक्त करत ब्राझीलच्या राष्ट्रपतींप्रती कृतज्ञता व्यक्त केली. त्यांनी लिहिले, “सर, @LulaOficial. तुमच्या दयाळू शब्दांबद्दल तुमचे खूप खूप आभार. तुम्ही भारतीय सिनेमाचा उल्लेख केला आणि RRR चा आनंद घेतला हे जाणून खूप आनंद झाला!! आमची टीम उत्साही आहे. आम्हाला आशा आहे की आमच्या देशात तुमचा चांगला वेळ जाईल.

तसेच ‘RRR’ चित्रपटातील ‘नातू नातू’ या गाण्याने गोल्डन ग्लोबमध्ये सर्वोत्कृष्ट गाण्याचा पुरस्कार जिंकला.शिवाय गोल्डन ग्लोब पुरस्कारांमध्ये नामांकने मिळवणारा ‘RRR’ हा पहिला तेलुगू चित्रपट असून भारतीय चित्रपटाच्या इतिहासात नामांकन मिळवणारा तिसरा चित्रपट आहे.

Exit mobile version