मुंबई वाहतूक पोलिसांनी सोमवारी सांताक्रूझ पूर्व येथे जी-२० बैठकींच्या संदर्भात शहरातील काही भागांतील वाहतुकीवर निर्बंध लागू केले आहेत. १२ डिसेंबरच्या मध्यरात्री ते १६ डिसेंबरच्या संध्याकाळी ४ वाजेपर्यंत हे निर्बंध लागू असतील अशी माहिती समोर आली आहे.
नवे लागू केलेले नियम असे आहेत की हनुमान मंदिर, नेहरू रोड, जुना सीएसटी रोड आणि पॅटक गाला कॉलेज येथून हॉटेल ग्रँड ह्यात्त, सांताक्रूझकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना (आपत्कालीन सेवेची वाहने वगळून) प्रवेश आणि पार्किंग नसेल. हनुमान मंदिर, नेहरू रोड येथून पुढे जाणारी वाहने मिलिटरी जंक्शनकडे जातील आणि कलिना जंक्शनपासून उजवीकडे वळण घेऊन आंबेडकर जंक्शन किंवा हंस भुगरा रोडकडे जातील. जुन्या सीएसटी रोडवरून वाहनांची वाहतूक हंस भुगरा जंक्शनवरून उजवीकडे वळण घेऊन वाकोला जंक्शन मार्गे नेहरू रोड, सांताक्रूझ स्टेशन किंवा वेस्टर्न एक्सप्रेस हायवेकडे जाईल.
हे ही वाचा:
गोपीनाथ मुंडे : जनसामान्यांचा नेता
भूपेंद्र पटेल यांनी सलग दुसऱ्यांदा घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ
अनिल देशमुख्यांच्या जामिनावर टांगती तलवार
नागपूर मेट्रोने कोरले गिनीज बुकात नाव
१३ डिसेंबरसाठी ही नवे नियम बनवण्यात आले आहेत. त्यात रीगल जंक्शनपासून छत्रपती शिवाजी महाराज मार्गाच्या उत्तरेकडील आणि दक्षिणेकडील वाहनांच्या वाहतुक बंद असेल. बोमन बेहराम रोड जंक्शन आणि महाकवी भूषण मार्ग जंक्शन दरम्यानचा आदम स्ट्रीट हा वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद असणारा दुसरा मार्ग आहे. मंडलिक स्ट्रीट ते बोमन बेहराम रोड आणि शहीद भगतसिंग मार्ग ते महाकवी भूषण मार्ग जंक्शन दरम्यानचा भाग देखील आपत्कालीन वाहनांशिवाय वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद असेल. याकरिता पर्यायी मार्ग आहेत – रीगल सर्कल दक्षिण – महाकवी भूषण मार्ग – ताज पॅलेस – बोमन बेहराम रोड – अल्वा चौक – इलेक्ट्रिक हाउस – एसबीएस रोड. आणि बॉम्बे प्रेसिडेन्सी क्लब (रेडिओ क्लब) ते आदाम स्ट्रीट जंक्शनपर्यंतचा पर्यायी मार्ग आझमी रोड-भिड भंजन मंदिर-एसबीएस रोड असेल.
या बैठकीच्या निमित्ताने मुंबईत सर्वत्र बॅनर झळकले असून मध्यंतरीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय राज्य प्रमुखांची अर्थात मुख्यमंत्र्यांची एक बैठक आयोजित करण्यात आली होती. त्याअनुसार विविध राज्यांचे मुख्यमंत्री तिथे उपस्थित राहिले होते.