मुंबईकरांना अखेर उपनगरीय रेल्वे गाड्यांमधून प्रवास करण्यासाठी आनंददायक बातमी आहे. आता मुंबईकरांना लोकल ट्रेनने प्रवास करण्यासाठी लोकलंच तिकीट मिळणार आहे. मुंबईकरांसाठी ही दिलासादायक आणि आनंदाची बातमी आहे. आता पूर्वीप्रमाणेच एक दिवसाच्या प्रवासासाठी संपूर्ण महिन्याचा पास काढण्याची आवश्यकता नसून त्यासाठी रेल्वेचे तिकीट मिळणार आहे. उद्या म्हणजेच सोमवारपासून हा निर्णय लागू होणार आहे.
लोकलचे तिकीट लसीकरण पूर्ण झालेल्यांना आणि लसीकरण होऊन १५ दिवस झालेल्यांना मिळणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंधने घालून रेल्वे सेवा सुरू करण्यात आली होती. सुरुवातीला केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना रेल्वेने प्रवास करण्याची मुभा देण्यात आली होती. त्यानंतर कालांतराने लसीकरण पूर्ण झालेल्या नागरिकांना प्रवासाची मुभा देण्यात आली. मात्र, तिकीट देण्यात येत नव्हते केवळ मासिक पास घेऊनचं प्रवासला मुभा होती. त्यामुळे एक दिवस प्रवास करणाऱ्यांना आर्थिक भुर्दंड बसत होता. प्रवाशांनी यावर प्रचंड नाराजीही व्यक्त केली होती. सरकारच्या या निर्णयामुळे बससेवेवर आणि रस्ते वाहतुकीवरही ही मोठा ताण येत होता.
हे ही वाचा:
दिवाळीसाठी रोषणाई करताना कुटुंबाला लागला विजेचा धक्का; एकाचा मृत्यू
गाणी वाजवणाऱ्यांना तालिबानींनी घातल्या गोळ्या; १३ ठार
गांजा फुकून आरोप करताना थोडा अभ्यास करा
१० दिवसांत महाराष्ट्रात ४ बँका केल्या साफ!
मात्र, आता एक दिवसाच्या प्रवासाचं तिकीट नागरिकांना प्राप्त होणार असल्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र यासाठी लसीकरण होऊन १५ दिवस झालेले असणे हा नियम बंधनकारक असणार आहे.