कोरोना लस घेतलेल्यांना रेल्वे तिकिट का नाही?

कोरोना लस घेतलेल्यांना रेल्वे तिकिट का नाही?

लोकल सुरु नसल्यामुळे सर्वसामान्यांचे हाल आता खूप होताहेत. त्यामुळे आता प्रवासी संघटना ठाकरे सरकारविरोधात चांगल्याच आक्रमक झालेल्या आहेत. ठाकरे सरकारला प्रवासी संघटनांनी इशारा देत दोन लशी घेतलेल्यांना तिकिट मिळायला हवे, अशी मागणी केली आहे.

कोरोना लस घेतल्यानंतर आंतरराष्ट्रीय पर्यटनाला परवानगी आहे मग लोकल प्रवास का नाही असा सवाल आता ठाकरे सरकारला विचारत आहेत. मुंबईसाठी लोकल प्रवास हा केव्हाही वेळेची बचत होणारा असल्याकारणाने, सर्वसामान्य मुंबईकराची भिस्त ही लोकल प्रवासावर अधिक आहे.

ज्येष्ठ नागरिकांना पेन्शनच्या कामानिमित्त जाण्यासाठी महिन्यातून जेमतेम चार-सहा वेळा जावे लागते. मात्र, ज्येष्ठ नागरिकांना यासाठी एका महिन्याचा पास काढावा लागत आहे. इतकेच नव्हेतर अनेक छोट्या व्यावसायिकांना मुंबईतील घाऊक बाजारातून सामग्री विकत घेण्यासाठी महिन्यातील काही दिवस प्रवास करावा लागतो. मात्र, त्यांना देखील एका महिन्यांच्या मासिक पास काढावा लागत आहे. तर, अनेक व्यावसायिकांना महिन्यातील काही दिवसच मध्य, पश्चिम, हार्बर, ट्रान्स हार्बरवरून प्रवास करायचा असतो. परंतु, या सर्व मार्गिकेचा मासिक पास काढणे लसंवतांना परवडणारे नाही. त्यामुळे लसवंताना मासिक पास दिला पाहिजे, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.

मागील एका महिन्यापासून कोरोनाचे दोन डोस घेतलेल्या लसवंतांचा लोकल प्रवास सुरु आहे. मात्र, या प्रवाशांना लोकलचे तिकीट मिळत नसल्याने मासिक पास काढून प्रवास करावा लागतोय. परंतु, ज्या प्रवाशांना महिन्यातून बोटावर मोजण्याइतक्याच दिवशी प्रवास करायचा असतो, त्यांना देखील मासिक पास काढून आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. त्यामुळे आता लसवंतांना लोकल तिकिट देण्याची मागणी जोर धरत आहे.

हे ही वाचा:

पाकिस्तानसारख्या “फेल्ड स्टेट” कडून धड्यांची गरज नाही

२१ दिवस क्वारंटाईन करूनही चीनमध्ये कोरोना कसा?

स्वातंत्र्यवीर सावरकर नव्हे, नेहरूच होते माफीवीर!

भूपेंद्र पटेल सरकारमध्ये सर्व नवीन चेहऱ्यांना संधी

राज्य सरकारच्या सुचनेनुसार १५ ऑगस्टपासून कोरोनाचे दोन डोस घेतलेल्या प्रवाशांना लोकल प्रवास खुला केला. त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसह लसवंतांचा लोकल प्रवास सुरु झाला. मात्र, लसवंतांना मासिक पास देता येतो, तर तिकीट देण्यास काय हरकत आहे, असा सवाल प्रवाशांकडून विचारला जात आहे. राज्य सरकारने कोरोनाची तिसऱ्या लाटेची भीती दाखविणे बंद केले पाहिजे. तसेच आता सर्वसामान्य प्रवाशांसाठी २४ तासांपैकी काही वेळा प्रवास खुला करून द्यावा, अशी मागणी आता होऊ लागलेली आहे.

Exit mobile version