नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत मविआच्या पराभवानंतर नाना पटोले यांनी महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचे वृत्त समोर आले होते. पटोलेंनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मात्र, पक्षाच्या उच्च कमांडने तो अद्याप स्वीकारला नसल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. दाखेर राजीनाम्याच्या या चर्चेला पूर्णविराम लागला आहे. काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला नसल्याचे स्वतः नाना पटोलेंनी सांगितले आहे.
काँग्रेस नेते नाना पटोले आज दिल्लीला रवाना झाले होते, त्यामुळे राजीनाम्याच्या चर्चेला उधान आले होते.मात्र, राजीनाम्यावर त्यांनी साफ नकार दिला. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीत मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेतली. निवडणुकीतील काँग्रेसच्या कामगिरीबाबत या बैठकीत चर्चा झाली.
दरम्यान, भंडारा जिल्ह्यातील साकोली मतदार संघातून नाना पटोले उभे राहिले होते. त्यांच्या विरुद्ध भाजपचे अविनाश ब्राह्मणकर उभे होते. या ठिकाणी देखील दोघांमध्ये अटीतटीचा सामनाला बघायला मिळाला. नाना पटोले यांना ९६७९५ तर अविनाश ब्राह्मणकर यांना ९६५८७ इतकी मते मिळाली. नाना पटोले केवळ २०८ मतांनी विजयी झाले.
हे ही वाचा :
पर्थचा अभेद्य किल्ला भेदला! भारताचा ऑस्ट्रेलियावर २९५ धावांनी ऐतिहासिक विजय
१३२ सीट, स्ट्राईक रेट ८९ टक्के, मुख्यमंत्री म्हणून भाजपचा चेहरा फडणवीसच!
संभलमध्ये हिंसाचार भडकावल्याप्रकरणी सपा खासदार झियाउर बुर्क यांच्यावर गुन्हा दाखल
‘दर्शन घे काकांचं, थोडक्यात वाचलास’