रेल्वेच्या जनरल डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना जेवण मिळत नसल्याने उपाशी पोटी प्रवास करण्याची वेळ बऱ्याचदा येते. मात्र रेल्वे विभागाने जनरल डब्यातील प्रवाशांना बजेट फ्रेंडली जेवण उपलब्ध करुन दिले आहे. रेल्वेच्या जनरल डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना फक्त २० रुपयांत जेवण मिळणार आहे.
रेल्वे विभागाने जारी केलेल्या निवेदनात लांबपल्ल्याच्या १५ प्रमुख रेल्वे स्थानकांवर २० रुपयात जेवण उपलब्ध करुन देणार असल्याचं सांगितलं आहे. रेल्वे प्रवाशांना कमी पैशात, पौष्टिक आणि स्वच्छ अन्न मिळावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मध्य रेल्वे ‘केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनच्या (आईआरसीटीसी) सहकार्याने अनारक्षित डब्यांमध्ये अवघ्या २० रुपयांत भरपेट जेवण उपलब्ध करून देण्यात येणार आहे.उन्हाळ्याच्या सुट्टीत प्रवाशांची वाढणारी अतिरिक्त गर्दी पाहता भारतीय रेल्वेने हा निर्णय घेतला आहे.
हे ही वाचा:
“नकली शिवसेनेने सोनिया गांधींच्या भीतीने प्राणप्रतिष्ठा सोहळा टाळला”
संजय राऊतांचे निकटवर्ती प्रवीण राऊतांची ७३ कोटींची मालमत्ता जप्त
भाषणादरम्यान नितीन गडकरींना आली भोवळ, स्टेजवर कोसळले!
नुडल्सच्या पाकिटात होते दोन कोटींचे हिरे
२० आणि ५० रुपयांत हे जेवण दिले जाणार असून तीन रुपयांत पाण्याचा ग्लास दिला जाणार आहे.सर्वसामान्य डब्यांजवळ रेल्वे स्थानकावर असलेल्या काउंटरवर हे जेवण मिळणार आहे. २० रुपयांमध्ये मिळणाऱ्या इकोनॉमी जेवणात सात पुऱ्या (१७५ ग्रॅम), बटाट्याची भाजी (१५० ग्रॅम) आणि लोणचे देणार आहे. तर ५० रुपयांत (कॉम्बो पॅक) मिळणाऱ्या जेवणाच्या पाकिटात राजमा, छोले, भात, खिचडी, पावभाजी, मसाले डोसा दिले जाणार आहे.
मध्य रेल्वेच्या इगतपुरी, कर्जत, मनमाड, खंडवा, बडनेरा, शेगाव, पुणे, मिरज, दौंड, साईनगर, शिर्डी, नागपूर, वर्धा, सोलापूर, वाडी आणि कुर्डुवाडी या स्थानकांवर सुरवातीला हे फूड काउंटर उपलब्ध करून देण्यात आले आहेत.दरम्यान, भारतीय रेल्वेने सध्या देशातील १०० रेल्वे स्थानकावर १५० इकोनॉमी मील काउंटर सुरु केले आहे. यामध्ये टप्प्या टप्प्याने वाढ होणार आहे.