भारतीय बँकांची हजारो कोटी रुपयांची फसवणूक करणारा फरार उद्योगपती नीरव मोदीला मोठा झटका बसला आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) नीरव मोदीची २९ कोटी ७५ लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आणि बँक बॅलन्स जप्त केला आहे. पीएनबी बँक घोटाळा प्रकरणात नीरव मोदीविरोधात ईडीने ही कारवाई केली आहे.
सीबीआयने नोंदवलेल्या एफआयआरच्या आधारे ईडीने तपास सुरु केला होता. भारतीय दंड संहिता १८६० आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा, १९८८ च्या कलमांतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला असून एकूण ६४९८.२० कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा नीरव मोदीवर आरोप आहे.
तपासादरम्यान, ईडीला नीरव मोदी आणि त्याच्या कंपन्यांच्या कोट्यवधींची जमीन आणि बँक खात्यांची माहिती मिळाली होती. त्यानुसार कारवाई करत नीरव मोदीची २९ कोटी ७५ लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आणि बँक बॅलन्स जप्त केला. यामध्ये जमीन, इमारती आणि बँक खात्यातील ठेवींचा समावेश आहे. पीएमएलए, २००२ कायद्यांतर्गत या मालमत्ता तात्पुरत्या स्वरुपात जोडल्या गेल्या आहेत.
हे ही वाचा :
राहुल गांधींच्या शीखांवरील वक्तव्याविरोधात दिल्लीत आंदोलन !
बेकायदेशीर असेल तर मशिदी, मदरसेही पाडले पाहिजेत!
गणेशमूर्तींच्या विटंबनेसाठी केला मुलांचा वापर !
पीएमएलए तपासादरम्यान, याआधीही ईडीने नीरव मोदी आणि त्याच्या साथीदारांची भारत आणि परदेशातील २५९६ कोटी रुपयांची जंगम आणि स्थावर मालमत्ता जप्त केली होती.