24 C
Mumbai
Saturday, November 23, 2024
घरविशेषफरार उद्योगपती नीरव मोदीची उंदीर-घुशींपासून सुटका!

फरार उद्योगपती नीरव मोदीची उंदीर-घुशींपासून सुटका!

खासगी तुरुंगात रवानगी

Google News Follow

Related

पंजाब नॅशनल बँकेच्या इतिहासातील सर्वांत मोठी फसवणूक केल्याचा आरोप असलेला फरारी भारतीय उद्योगपती नीरव मोदी याला ब्रिटनमधील सर्वात जास्त गर्दीच्या, घाणेरड्या आणि उंदरांनी ग्रस्त असलेल्या तुरुंगातून लंडनच्या एकमेव खासगी कारागृहात पाठवण्यात आले आहे.

नीरव मोदी (५२) याची एचएमपी वँड्सवर्थ येथून ग्रीनविचमधील एचएमपी थेमसाइड येथे बदली करण्यात आली आहे. हा तुरुंग मार्च २०१२मध्ये बांधण्यात आला होता. या तुरुंगाची नुकतीच तपासणी करून अहवाल सादर करण्यात आला होता. या तुरुंगात कैद्यांना दररोज साडेतेवीस तास बंदिस्त ठेवले जाते तसेच, त्यांच्यासाठी काहीही उपक्रम राबवले जात नाहीत, अशी टीका करण्यात आली होती. मात्र त्याचवेळी येथील कैदी हे स्वच्छ आणि चांगल्या वातावरणात राहतात. त्यांच्या कोठडीत फोनही आहे, याबद्दल या अहवालात कौतुक करण्यात आले होते.

तर, एचएमएपी वँड्सवर्थच्या तुरुंगातील परिस्थितीवर टीका करण्यात आली होती. ‘इथे खूप गर्दी आहे. येथील कैदी अत्यंत बिकट परिस्थितीत राहतात,’ अशा शब्दांत या तुरुंगाचे वर्णन करण्यात आले होते. तसेच, येथे हिंसाचाराच्या घटना वाढत आहेत आणि मोठ्या कचराकुंड्यांमुळे उंदीर-घुशींना आमंत्रण मिळते आहे, असेही यात नमूद करण्यात आले होते.६ सप्टेंबर रोजी एचएमपी वँड्सवर्थमधून डॅनियल खलिफे हा कैदी पळून गेला होता. या प्रकरणाच्या तपासाला मदत व्हावी, यासाठी सावधगिरीचा उपाय म्हणून सुमारे ४० कैद्यांना या तुरुंगातून बाहेर हलवण्यात आले होते. मात्र नंतर त्याला अटक करण्यात आली होती.

हे ही वाचा:

व्हीप न मानणाऱ्या ठाकरे गटाच्या खासदारांवर कारवाई करणार

मध्य प्रदेशात १२ वर्षीय मुलीवर बलात्कार

गुगलवर आत्महत्येचा मार्ग शोधणाऱ्या तरुणाचा जीव वाचवला!

कोळसा घोटाळा प्रकरणात विजय दर्डांसह इतर आरोपींच्या शिक्षेला स्थगिती

भारतात प्रत्यार्पण करण्याविरोधात न्यायालयीन लढा देण्यासाठी नीरव मोदी याला दीड कोटी रुपयांहून अधिक रक्कम भरणे अपेक्षित आहे. मात्र त्याने ती रक्कम न भरल्याने त्याला गेल्या आठवड्यात बार्किंगसाइड न्यायालयापुढे सादर करण्यात येणार होते. नोव्हेंबर २०२२मध्ये नीरव मोदी याने हा खटला गमावला होता. मात्र या संदर्भात त्याची सुनावणी होऊ शकली नाही. त्याला दुसऱ्या तुरुंगात पाठवल्याचे न्यायालयाला कळवले गेले नाही. त्यामुळे एचएमपी थेम्ससाइड येथील तुरुंगात त्यांना व्हिडीओ लिंकचे सेटअप करता आले नाही. त्याच्या प्रत्यार्पणाच्या निर्णयाविरोधात अपील करण्यास डिसेंबर २०२२मध्ये परवानगी नाकारण्यात आली होती. परंतु काही कायदेशीर समस्येमुळे त्याचे प्रत्यार्पण होऊ शकले नाही. म्हणून नीरव मोदी अद्यापही ब्रिटनच्या तुरुंगात आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
193,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा