गोरेगावमधील नेस्को कोवीड सेंटरमध्ये कोरोना योद्ध्यांनीच आंदोलन पुकारले आहे. कोवीड उपचारांसाठी अहोरात्र झटणाऱ्या या योद्ध्यांना प्राथमिक सुविधाही उपलब्ध होत नसल्यामुळे आपल्या हक्कांसाठी या योद्ध्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. रविवार, ९ मे रोजी गोरेगावच्या नेस्को कोवीड सेंटरमधील सगळ्या डॉक्टर्स, नर्सेसनी संप पुकारला.
देशात सध्या कोरोनाचे तांडव सुरु असून यात महाराष्ट्र होरपळून निघत आहे. देशातील सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण हे महाराष्ट्रात सापडत आहेत. राज्याला या बिकट परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी डॉक्टर, नर्सेस आणि आरोग्य व्यवस्थेशी संबंधित इतर कर्मचारी अहोरात्र झटत आहेत. पण राज्यातील प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे त्यांच्यावर आपल्या हक्कांसाठी आंदोलन करायची वेळ आली आहे.
हे ही वाचा:
पाक समर्थक इम्रान खानला अमेठीत अटक
शिवसेनेच्या प्रदीप शर्मांवरही आता खंडणीचा आरोप
पंतप्रधान मोदींची बदनामी करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यावर गुन्हा
मुंबईतील गोरेगाव भागातील नेस्को कोवीड सेंटर येथील कोरोनायोद्ध्या डॉक्टर्स, नर्सेस यांनी रविवार, ९ मे रोजी स्थानिक प्रशासनाच्या विरोधात आंदोलन छेडले. या कोरोना योद्ध्यांच्या राहण्याच्या आणि खाण्या-पिण्याच्या प्राथमिक गरजाही पूर्ण होत नाहीयेत. या संबंधी वरिष्ठांकडे तक्रार केली असता त्यांनीही याला कोणताच प्रतिसाद दिला नाही. अखेर नाईलाजास्तव या योद्ध्यांवर आंदोलन करण्याची वेळ आली आहे. या संपात नेस्को सेंटरमधील डॉक्टर्स आणि १५० नर्सेस सहभागी झाल्याची माहिती मिळत आहे. तसेच मागण्या पूर्ण होत नाहीत तोवर संप मागे न घेण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.