आपचे निलंबित खासदार राघव चढ्ढा यांनी राज्यसभेच्या अध्यक्षांची माफी मागावी!

खासदार राघव चड्ढा यांना सर्वोच्च न्यायालयाच्या सूचना

आपचे निलंबित खासदार राघव चढ्ढा यांनी राज्यसभेच्या अध्यक्षांची माफी मागावी!

आपचे निलंबित खासदार राघव चढ्ढा यांनी आपल्या वर्तनाबद्दल राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनकर यांची भेट घेऊन माफी मागावी अशी सूचना सर्वोच्च न्यायालयाने दिली आहे.विशेषाधिकार समितीचा निर्णय येईपर्यंत खासदार राघव चढ्ढा यांचे ऑगस्ट महिन्यात संसदेतून अनिश्चित काळासाठी निलंबन करण्यात आले होते.यावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली.

खासदार राघव चढ्ढा यांनी दिल्ली सेवा विधेयक निवड समितीकडे एक प्रस्ताव पाठवला होता.दिल्ली सेवा विधेयक निवड समितीकडे पाठवण्यात आलेल्या प्रस्तावावर राज्यसभेतील पाच खासदारांनी दावा केला होता की, समितीमध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी राघव चढ्ढा यांनी आमची परवानगी घेतली न्हवती.या पाच खासदारांमध्ये सस्मित पात्रा, नरहरी अमीन,सुधांशू त्रिवेदी, नागालँडचे खासदार फांगनॉन कोन्याक आणि लोकसभेचे माजी उपसभापती थंबीदुराई यांचा समावेश आहे.

या आरोपानंतर आपचे खासदार राघव चढ्ढा यांना ११ ऑगस्ट रोजी संसदेतून अनिश्चित काळासाठी निलंबित करण्यात आले होते.या प्रकरणी आज शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली.आपचे निलंबित खासदार राघव चढ्ढा यांनी आपल्या वर्तनाबद्दल राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनकर यांची भेट घेऊन माफी मागावी अशी सूचना आज सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आली.

हे ही वाचा:

मुंबईहून सिंधुदुर्गला विमान गेलं पण आकाशात घिरट्या घालून माघारी आलं

ललित पाटीलसह त्याच्या १२ साथीदारांवर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई

भारत- श्रीलंका सामन्यादरम्यान ११ विक्रम

‘मुली, मी तुला आशीर्वाद देतो, तुझे नाव लिही. मी तुला नक्की पत्र लिहीन’

भारताचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने सांगितले की, राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनकर यांची राघव चढ्ढा यांनी माफी मागावी .धनकर यांची माफी मागितल्यानंतर ते पुढचा विचार करून यातून पुढे जाण्याचा मार्ग काढतील.तसेच खासदार राघव चढ्ढा हे सर्वात तरुण असल्याचे CJI ने नमूद केले.

याप्रकरणी राघव चढ्ढा यांचे वकील म्हणाले, कोणत्याही प्रकारे सभागृहाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहचवण्याचा हेतू खासदार राघव चढ्ढा यांचा न्हवता.याअगोदर सुद्धा आपल्या गैरवर्तनाबद्दल राघव चढ्ढा यांनी माफी मागितली आहे. अध्यक्ष जगदीप धनकर यांची माफी मागण्यास राघव चढ्ढा यांची काही हरकत नसल्याचे त्यांनी सांगितले.याप्रकरणी राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनकर यांच्या वेळेनुसार राघव चढ्ढा माफी मागतील असे त्यांनी नमूद केले.

Exit mobile version