हरियाणाच्या नूह येथे राहणारी नौक्षम चौधरी यांनी भरतपूर जिल्ह्यातील कामा विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर विजय मिळवला आहे. नौक्षम चौधरी यांना ७८ हजार ६४६ मते मिळाली. त्यांनी अपक्ष उमेदवार मुख्तियार अहमद यांना १३ हजार ९०६ मतांनी पराभूत केले. तर, सरकारमध्ये मंत्रिपदी असणाऱ्या जाहिदा खान तिसऱ्या क्रमांकावर फेकल्या गेल्या.
नौक्षम चौधरी यांनी सन २०१९मधील हरियाणा विधानसभा निवडणुकीत पुन्हाना मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. मात्र त्या तिथून पराभूत झाल्या. मात्र राजस्थान विधानसभा निवडणुकीत त्या विजयी झाल्या. कामा मतदारसंघ मुस्लिमबहुल म्हणून ओळखला जातो.
हे ही वाचा:
शार्कने घेतला महिलेच्या पायाचा घास; पाच वर्षांच्या मुलीसमोर मातेचा मृत्यू!
अमली पदार्थ विरोधी पथकाकडून वर्षभरात ४८ कोटींचा अमली पदार्थ जप्त
द. आफ्रिकेच्या संघाची घोषणा; टेंबा बावुमाला कर्णधारपदावरून हटवले
नौदल अधिकाऱ्यांच्या सन्मानचिन्हांत आता शिवाजी महाराजांचे प्रतिबिंब
३० वर्षीय नौक्षम हरियाणातील नूह जिल्ह्यातील पैमा खेडा गावातील रहिवासी आहेत. त्यांनी डबल एमए असून लंडनमधून त्यांनी मासमीडियाचे शिक्षण घेतले आहे. त्यांनी दिल्ली विद्यापीठातून पदवी आणि युरोपच्या विद्यापीठातून पोस्ट ग्रॅज्युएशन केले आहे. त्यांनी शिक्षण, वीज, रस्ते, पाणी तसेच, भ्रष्टाचारमुक्त शासन या आपल्या प्राथमिकता असतील, असे आश्वासन दिले आहे.
नौक्षम चौधरी यांना जेव्हा राजस्थानमधून उभे केले, तेव्हा त्या बाहेरच्या उमेदवार असल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. मात्र जाहिदा खान यांच्या विरोधात त्यांच्या समुदायामध्ये नाराजी होती आणि मुस्लिम समुदायाने अपक्ष उमेदवार म्हणून मुख्त्यार अहमद यांना उतरवले होते, जेणेकरून ते जाहिदा खान यांना पराभूत करू शकतील. त्यामुळे मुस्लिम मते विभाजित झाली आणि त्याचा फायदा कुठे ना कुठे नौक्षम चौधरी यांना मिळाला.