23 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरविशेषइराणपासून चीनपर्यंत केवळ एकच सुदृढ लोकशाही, ती म्हणजे "भारत"

इराणपासून चीनपर्यंत केवळ एकच सुदृढ लोकशाही, ती म्हणजे “भारत”

या वर्षी पत्रकारिता आणि सोशल मीडियामधील उल्लेखनीय कामगिरीबद्दल अजित गोगटे, धीरज वाटेकर, प्रज्ञा पोवळे, अक्षय मांडवकर, सचिन गायकवाड, गौरव ठाकुर, ओंकार दाभाडकर, वनश्री राड्ये, या ८ जणांचा 'देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार २०२४' देऊन गौरव करण्यात आला.

Google News Follow

Related

विश्व संवाद केंद्र, मुंबईतर्फे दरवर्षी पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पत्रकारांचा ‘देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार’ देऊन गौरव केला जातो.या वर्षीचा ‘देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार’ सोहळा शनिवारी (१७ ऑगस्ट) कीर्ती कॉलेज, दादर मुंबई येथे पार पडला. याच सोहळ्याच्या वेळी प्रमुख पाहुणे IPS ब्रजेश कुमार सिंह बोलत होते.

डॉ. ब्रजेश कुमार सिंह (IPS) आपल्या संभाषणात म्हणाले की, इराणपासून चीनपर्यंत केवळ एकच सक्षम लोकशाही आहे ती म्हणजे भारत. सोबतच सध्याच्या पत्रकारितेच्या घसरलेल्या दर्जाबद्दल त्यांनी काळजी व्यक्त केली आहे. काही देशांच्या संसदेमध्ये सोशल मीडियावर चिंता व्यक्त केली जाते, याकडे त्यांनी लक्ष वेधले. याच विषयाला अनुसरून पुरस्कारार्थी सोशल मीडिया इन्फ्लूएंसर गौरव ठाकूर यांनी आजमितीला जे देशविघातक नॅरेटिव्ह पसरवले जात आहेत, ते आपण सगळ्यांनी एकत्र मिळून हाणून पाडले पाहिजे, असे नमूद केले. पुरस्कारार्थी ज्येष्ठ पत्रकार अजित गोगटे यांनी मनोगत व्यक्त करताना व्यावसायिक कारकिर्दीतील आपला हा पहिला पुरस्कार असल्याचे सांगितले.

हे ही वाचा:

साबरमती एक्स्प्रेसचे २२ डबे रुळावरून घसरले, रेल्वे वाहतूक ठप्प !

लव्ह जिहाद प्रकरणावरून उल्हासनगरमध्ये हिंदू जनआक्रोश मोर्चाचे आयोजन !

विश्व संवाद केंद्र, मुंबईचे मुख्य संवाद अधिकारी डॉ. निशीथ भांडारकर म्हणाले की, या सोहळ्याचे हे २३ वे वर्ष आहे आणि त्याच अनुषंगाने या वर्षी पत्रकारिता आणि सोशल मीडियामधील उल्लेखनीय कामगिरीबद्दल अजित गोगटे, धीरज वाटेकर, प्रज्ञा पोवळे, अक्षय मांडवकर, सचिन गायकवाड, गौरव ठाकुर, ओंकार दाभाडकर, वनश्री राड्ये, या ८ जणांचा ‘देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार २०२४’ देऊन गौरव करण्यात आला.

‘विश्व संवाद केंद्र, मुंबई’चे अध्यक्ष सुधीर जोगळेकर यांनी नारद पुरस्काराबद्दल माहिती सांगितली. या पुरस्काराकरिता अर्ज मागवले जात नाहीत, हे या पुरस्काराचे वैशिष्ट्य असल्याचे देखील त्यांनी सांगितले. निवड समिती पुरस्कारार्थींची निवड करते. मूल्याधिष्ठित पत्रकारिता करणारे आणि विशुद्ध चारित्र्याच्या पत्रकारांना हा पुरस्कार प्रदान केला जातो.

हे ही वाचा:

मुंबई उपनगर: भांडुपमध्ये हिंदुंवरील सततच्या आक्रमणाच्या विरोधात सकल हिंदू समाजाने पुकारला बंद!

वाशीमधील इनॉर्बिट मॉल बॉम्बने उडवून देण्याची धमकी !

तीन रोहिंग्या अटकेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा