नुकताच महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात अनेक मोठ्या घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्या. या अर्थसंकल्पात महिलांसाठी अनेक घोषणा करण्यात आल्या. सर्वात महत्त्वाची घोषणा म्हणजे एसटी बसमध्ये महिलांना तिकिटात ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय. या निर्णयाचे सर्वच स्थरातून, विशेष म्हणजे ग्रामीणभागातून स्वागत झाले. ग्रामीण भागाची लाइफ लाइन म्हणून लालपरीची ओळख. महिलांना अर्धे तिकीट द्यावे, असा कोणताची आदेश अजूनही प्रशासनाला न मिळाल्यामुळे या योजनेपासून महिला प्रवाशी अजूनही वंचित आहेत. त्यामुळे वादावादी सुरू आहे. काही ठिकाणी कर्मचाऱ्यांरी आणि प्रवासी यांमध्ये वादावादी होऊन मारहाणीच्या घटनाही घडल्यात.
एसटी महामंडळाची लालपरीची वाट पाहीन पण एसटीनेच जाईन ही ग्रामीण भागाची ओळख. ग्रामीण भागात प्रवासासाठी एसटीला प्राधान्य दिले जाते. गोरगरीब प्रवाशांना या बसचा मोठा आधार असतो. परंतु अर्धा तिकिटाचा जीआर अजून निघालेला नाही, तर १ एप्रिलपासून या योजनाचे लाभ मिळणार आहे, असे कळते. याबाबचे आदेश प्रशासनाला प्राप्त झाल्यानंतर याची अंबलबजावणी करण्यात येईल.
ग्रामीण भागात या घोषणेनंतर एसटी कर्मचाऱ्यांशी वाद होताहेत, त्यांना असे वाटत आहे की, हा निर्णय जाहीर झालाय. त्यामुळे आपणाला अर्धे तिकीट मिळायला पाहिजे. त्याचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. जनतेला हे माहित नाही की, शासन जोपर्यंत जीआर काढत नाही तोपर्यंत ही सवलत लागू होणार नाही. सवलतीचा लाभ घेता येणार नाही.
हेही वाचा :
संसदेत माफी मागण्याऐवजी राहुल गांधी गैरहजर राहतात!
पुण्यात बेकायदा वास्तव्य करणारा पाकिस्तानी तरुण पोलिसांच्या जाळ्यात
सावधान महाराष्ट्रात एन्फ्लूएंझा विषाणूचा धोका वाढतोय
६५ वर्ष पूर्ण झालेले नागरिक एसटी बसने अर्धा तिकिटाने प्रवास करतात. तर अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेअंतर्गत ७५ वर्षीय ज्येष्ठांना मोफत प्रवास सवलत आहे. त्यानंतर आता महिलांनाही ५० टक्के तिकीटात म्हणजेच हाफ तिकीटात प्रवास करता येणार आहे. या निर्णयाचे महिला वर्गाकडून स्वागत होत आहे. विशेष कामासाठी लांब प्रवास करणाऱ्या महिलांना या योजनेचा मोठा फायदा होणार आहे.