27 C
Mumbai
Thursday, September 19, 2024
घरविशेष'बांगलादेशातील परिस्थिती इतकी भीषण नाही की, भारतीयांना बाहेर काढण्याची गरज आहे'

‘बांगलादेशातील परिस्थिती इतकी भीषण नाही की, भारतीयांना बाहेर काढण्याची गरज आहे’

सर्वपक्षीय बैठकीत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचे व्यक्तव्य

Google News Follow

Related

बांगलादेशात बिकट परिस्थिती निर्माण झाली असून लष्कराने देशाचा ताबा घेतला आहे. या पार्श्वभूमीवर भारतात आज सर्वपक्षीय बैठक पार पडली. या सर्व पक्षीय बैठकीला परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी संबोधित केले. जयशंकर म्हणाले की, बांगलादेशातील परिस्थिती इतकी भीषण नाही की १२,००० – १३,००० भारतीयांना बाहेर काढण्याची गरज आहे. सरकारविरोधी निदर्शनांमुळे बांगलादेशातील शेख हसिना यांच्या नेतृत्वाखालील सरकार पडल्यानंतरच्या परिस्थितीवर सरकार बारकाईने लक्ष ठेवून आहे, ज्यात ३०० हून अधिक लोक मारले गेले आहेत. या बैठकीला दोन्ही सभागृहातील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह एनडीएचे सर्व मित्रपक्ष आणि बहुतांश विरोधी पक्ष उपस्थित होते. मात्र, आपल्याला या बैठकीचे निमंत्रण देण्यात आले नसल्याचा दावा ‘आप’ने केला आहे.

जयशंकर म्हणाले की, आरक्षणाच्या मागणीवरून झालेल्या माघील हिंसाचार दरम्यान ८,००० हजार भारतीय, ज्यामध्ये बहुतेक करून विद्यार्थी आहेत ते भारतात परतले आहेत. अजूनही बांगलादेशात १३,००० भारतीय नागरिक आहेत. परिस्थिती इतकी भीषण नाही की त्यांना बाहेर काढण्याची गज आहे. मात्र, आम्ही सर्व गोष्टींवर लक्ष ठेवून आहोत. तसेच सोमवारी पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन भारतात आलेल्या हसिना शेख यांच्याशी सरकारने थोडक्यात चर्चा केल्याचे त्यांनी सांगितले. सरकारला हसीना शेख यांना त्यांच्या भविष्यातील योजना ठरवण्यासाठी थोडा वेळ द्यायचा आहे,” असे जयशंकर यांनी सांगितले.

हे ही वाचा:

बांगलादेशमधील हिंसाचारामागे आयएसआय पुरस्कृत इस्लामी छात्र शिबीर संघटना?

अविनाश साबळेने रचला इतिहास, ३,००० मीटर स्टीपलचेस अंतिम फेरीत पोहोचणारा ठरला पहिला भारतीय !

बांगलादेशचे नेतृत्व आणि पंतप्रधानपदी मोहम्मद युनूस यांच्या नावाची चर्चा !

बांगलादेशातील इस्कॉन मंदिराची तोडफोड करून मंदिर पेटवले

या बैठकीला लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसचे ज्येष्ठ नेते के. सी. वेणुगोपाल, डीएमकेचे नेते टी. आर. बालू, जदयूचे लल्लन सिंह, समाजवादी पक्षाचे राम गोपाल यादव, तृणमूल काँग्रेसचे सुदीप बंडोपाध्याय व डॅरेक ओब्रायन, राष्ट्रीय जनता दलाकडून मिसा भारती, शिवसेना उबाठा गटाचे अरविंद सावंत, बिजू जनता जलाचे सस्मित पात्रा, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे व तेलुगू देसम पक्षाचे राम मोहन नायडू उपस्थित होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
177,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा