उत्तराखंड सरकारने शनिवारी चारधाम यात्रा सुरु करण्याची तारीख जाहीर केल्यामुळे भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. पण जोशीमठ येथे पुन्हा जमिनीला तडे गेल्याचे वृत्त आहे. त्यामुळे जोशीमठमधील परिस्थिती अजून सामान्य झाली की यावरून भाविकांमध्ये पुन्हा एकदा संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
बद्रीनाथ महामार्गावर जोशीमठजवळ आणखी १० मोठी भेगा गेल्याचे समोर आले आहे. सापडली आहेत. हा महामार्ग बद्रीनाथ या धार्मिक शहराला जोडतो, गढवाल हिमालयातील सर्वाधिक भेट देण्यात येणाऱ्या तीर्थक्षेत्रांपैकी एक हे तीर्थक्षेत्र आहे. जोशीमठ ते मारवाडी दरम्यान १० किमीच्या परिघात भेगा पडल्याचे स्थानिक लोकांचे म्हणणे आहे.
जोशीमठ बचाव संघर्ष समितीनेही जोशीमठ जवळील बद्रीनाथ महामार्गावर किमान १० ठिकाणी नवीनभेगा पडल्या असल्याचे म्हटले आहे. राज्य सरकारने केलेल्या दाव्याच्या उलट जुन्या भेगा रुंद होत आहेत आणि नवीन तडेही येऊ लागले आहेत.या महामार्गावर, रेल्वे गेस्ट हाऊसजवळ, जेपी कॉलनीशेजारी आणि मारवाडी पूल या ठिकाणी प्रामुख्याने तडे गेल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. याशिवाय सीमा रास्ता संघटनेने पूर्वी सिमेंटने भरलेल्या महामार्गावर पुन्हा खड्डे पुन्हा दिसू लागले आहेत असे नागरिकांनी म्हटले आहे.
हे ही वाचा:
शिवसेनेचे विधीमंडळातील कार्यालय शिंदे गटाच्या ताब्यात..शिवालयही येणार
आक्षेपार्ह विधानाविरोधात संजय राऊत यांच्यावर नाशिकमध्ये गुन्हा
रुग्ण म्हणून दाखल झाला आणि रुग्णालयातून चोरले महागडे नळ…
बाबासाहेब पुरंदरेंच्या शिवसृष्टीत जो येईल तो नवी ऊर्जा, प्रेरणा घेऊन जाईल!
केदारनाथ मंदिर समितीने चार धामांपैकी एक असलेल्या केदारनाथ धाम मंदिराचे दरवाजे उघडण्याची तारीख निश्चित केली आहे. केदारनाथ धाम मंदिराचे दरवाजे यावर्षी २५ एप्रिल रोजी उघडणार आहेत. केदारनाथ मंदिर २५ एप्रिल रोजी सकाळी ६.२० वाजता भाविकांसाठी खुले करण्यात येणार आहे. यानंतर २७ एप्रिल रोजी सकाळी ७.१० वाजता बद्रीनाथ धामचे दरवाजे उघडले जातील.