21 C
Mumbai
Wednesday, December 25, 2024
घरविशेष‘मेक इन इंडिया’ अंतर्गत फ्रेंच कंपनी थॉमसन भारतात लॅपटॉप बनवणार

‘मेक इन इंडिया’ अंतर्गत फ्रेंच कंपनी थॉमसन भारतात लॅपटॉप बनवणार

अँड्रॉईड स्मार्टफोनपेक्षा कमी किंमतीमध्ये लॅपटॉप उपलब्ध होणार

Google News Follow

Related

सध्या केंद्रातील मोदी सरकार ‘मेक इन इंडिया’ या अभियानाला प्रोत्साहन देत असून अनेक नावाजलेल्या कंपन्यांसाठी भारताची दारे उघडण्यात आली आहेत. अभियानावर मोठ्या प्रमाणात भर देत आहे. यासाठीच सरकारने २०२० साली प्रोडक्शन लिंक इंसेंटिव्ह (PLI) योजनेची सुरुवात केली होती. यामुळे जगभरातील कंपन्या भारतात येऊन उत्पादन करण्यास उत्सुक आहेत. दरम्यान, आता फ्रेंच कंपनी थॉमसन देखील भारतात लॅपटॉप बनवणार आहे.

नोएडामध्ये असणाऱ्या सहस्त्र समूहाला थॉमसन कंपनीने आपली पहिली ऑर्डर दिली आहे. पॉकेट फ्रेंडली एंट्री लेव्हल लॅपटॉप बनवण्याच्या उद्देशाने कंपनीने भारतीय आयटी हार्डवेअर मार्केटमध्ये प्रवेश केला आहे. थॉमसन कंपनीचे ग्लोबल जनरल मॅनेजर पिएरे क्रास्नोवस्की यांनी सांगितलं की, “सध्या ते एंट्री-लेव्हल लॅपटॉप सेगमेंटवर फोकस करत आहेत. साधारणपणे १९,९९० रुपयांपेक्षा कमी किंमतीत विंडोज-११ आधारित लॅपटॉप लाँच करण्याचा कंपनीचा विचार आहे. म्हणजेच, एखाद्या अँड्रॉईड स्मार्टफोनपेक्षा कमी किंमतीमध्ये लॅपटॉप उपलब्ध होणार आहे.”

विद्यार्थ्यांना प्रामुख्याने या लॅपटॉपचा वापर होईल असा उद्देश आहे. हा लॅपटॉप तयार झाल्यानंतर अमेझॉन, फ्लिपकार्ट, क्रोमा, विजय सेल्स अशा प्रमुख ई-स्टोअर्सवर उपलब्ध असणार आहे. यासोबतच सरकारी ई-मार्केटप्लेस (GEM) पोर्टलवर देखील हे उपलब्ध करण्यात येतील असं कंपनीने स्पष्ट केलं आहे.

हे ही वाचा:

केरळमधील अपहरण झालेल्या ६ वर्षीय मुलीची अखेर सुटका!

‘मुंबई आता जुनी झाली, बॉलीवूड हैदराबादला जाणार!’

ललित पाटील प्रकरणी ससूनच्या कर्मचाऱ्याला अटक

वादग्रस्त वक्तव्यानंतर जरांगे पाटलांची माघार; शब्द मागे घेत असल्याची कबुली

सहस्त्र समूहाचे सीईओ वरुण मनवाणी यांनी सांगितलं की, पहिल्या वर्षात ते एक लाख लॅपटॉप तयार करतील. पीएलआय योजनेचे पात्रता मानदंड पूर्ण करण्यासाठी ते एवढे लॅपटॉप बनवणार आहेत. तसंच, पुढील सहा वर्षांमध्ये या प्रोजेक्टसाठी २५० कोटी रुपये गुंतवणार असल्याचंही समूहाने स्पष्ट केलं आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा