भारत आजपासून म्हणजेच २१ जूनपासून कोव्हिड-१९ विरुद्धच्या लसीकरण मोहिमेच्या महत्त्वपूर्ण टप्प्यात प्रवेश करत आहे. आजपासून देशात १८ वर्षापेक्षा जास्त वयाच्या सर्व लोकांचे केंद्राकडून मोफत लसीकरण केले जाणार आहे. यासाठी कोवीन ऍपवर नोंदणी करणे अनिवार्य असणार नाही. ज्यामुळे दररोज होणाऱ्या लसीकरणाच्या तुलनेत आता लसीकरणात वाढ होण्याची शक्यता आहे.
आजपासून या टप्प्यात दररोज ५० लाख लोकांना लस देण्याचे सरकारचे उद्दीष्ट आहे. आतापर्यंत, दररोज ४० लाखांपेक्षा कमी लोकांचे लसीकरण करण्यात आले आहे. तसेच खासगी रुग्णालयांकरिता २५ टक्के लसींची खरेदीची खात्री केली आहे. त्यानुसार सरकारने खासगी क्षेत्राला या टप्प्याचा भाग बनवण्यास पुढाकार घेतला आहे. विशेष म्हणजे केंद्राच्या या निर्णयामुळे कोणत्याही खासगी रुग्णालयात कोरोना लसीसाठी जास्त पैसे आकारले जाणार नाहीत. कारण या लसीची किंमत निश्चित करण्यात आली आहे.
हे ही वाचा:
कोरोना रुग्णसंख्येचा ८८ दिवसांचा नीचांक
लोकसंख्या नियंत्रण कायदा आणायची योगी सरकारची तयारी
हॅाटेल चालकांना परवाना शुल्कात हवी सूट
आता विधि अभ्यासक्रम पदवीचा गोंधळ
आज २१ जूनपासून १८ वर्षावरील सर्वांना मोफत लस देण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यांना एक पैसाही खर्च करावा लागणार नाही. सर्वांना मोफत लस देण्याची जबाबदारी ही केंद्र सरकारची आहे. भारतात सर्वांना मोफत लस दिली जाईल. ज्यांना मोफत लस नको असेल त्यांना खासगी रुग्णालयात जाऊन लस घेता येईल, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी केली होती.