‘द केरळ स्टोरी’ पाहण्यासाठी जाणाऱ्या महिलांना मोफत तिकीट देणार

'द केरळ स्टोरी' जास्तीत जास्त लोकांनी पाहण्यासाठी अनोखी शक्कल

‘द केरळ स्टोरी’ पाहण्यासाठी जाणाऱ्या महिलांना मोफत तिकीट देणार

सध्या सुदीप्तो सेन दिग्दर्शित ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट चर्चेचा मुद्दा बनला आहे. या चित्रपटाविषयी दोन मतप्रवाह असून काही धार्मिक संघटनांनी हा चित्रपट मोफत दाखवण्याची जाहिरात केली आहे. तर, आळंदी येथील एका रिक्षा चालकाने थेट या चित्रपटासाठी मोफत रिक्षासेवा सुरु केल्याची बातमी समोर आली आहे.

महाराष्ट्रातील पुणे, आळंदी येथे राहणारे रिक्षाचालक साधू मगर यांनी ही अनोखी शक्कल लढवली आहे. ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट पाहण्यासाठी जाणाऱ्या लोकांना ते मोफत रिक्षा सेवा पुरवणार असल्याचं त्यांनी त्यांच्या रिक्षावर छापलं आहे. तसेच महिलांसाठीसुद्धा त्यांनी विशेष सवलत ठेवली आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी जाणाऱ्या पहिल्या १० महिलांना ते मोफत रिक्षा सेवेसह चित्रपटाचे तिकीट देखील मोफत देणार आहेत.

हिंदू महिलांनी हा चित्रपट पहावा आणि या कट्टरतावादी इस्लामी कारस्थानांबद्दल त्यांनी जागरूक आणि सतर्क राहावे यासाठी ही शक्कल लढवल्याचे त्यांनी सांगितले. साधू मगर हे अक्कलकोट शहरातील रहिवासी असून आळंदी आणि मरकळ परिसरात ते रिक्षा चालवतात.

हे ही वाचा:

महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ स्थापन करण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय! आणखी ‘हे’ निर्णय घेतले

चोंबडेपणा करू नका, संजय राऊतांना सुनावले!

… म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांनी पत्रकाराला विमानातून उतरवलं

संजय राऊत यांच्यापेक्षा शकुनी मामा बरा!

केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनीही या चित्रपटावर भाष्य केलं आहे. आरएसएसचा अजेंडा असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. चित्रपटाची कथा ही अदा शर्माच्या पात्राबद्दल भाष्य करणारी आहे जिचं धर्मपरिवर्तन करून तिला ISIS मध्ये सामील करण्यात आलं. तब्बल ३२ हजार महिलांना अशाप्रकारे ISIS मध्ये भरती करण्यात आल्याचं चित्रपटात दाखवलं गेलं आहे.

Exit mobile version