इर्शाळवाडी दुर्घटनाग्रस्तांना मोफत ‘शिवभोजन थाळीचे’ वाटप

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची माहिती

इर्शाळवाडी दुर्घटनाग्रस्तांना मोफत ‘शिवभोजन थाळीचे’ वाटप

रायगड परिसरातील मोरबे डॅमच्या वरील बाजूस असलेल्या इर्शाळगडाच्या पायथ्याशी वसलेले इर्शाळवाडी हे गाव, रात्री १०.३० ते ११ च्या दरम्यान डोंगराचा कडा खाली आला आणि त्यात ३० ते ४० घरं नागरिकांसह गाडली गेली. या घटनेची दखल घेत इर्शाळवाडी येथील लोकांना एक मदतीचा हात म्हणून माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दुर्घटनास्थळी मोफत शिवभोजन थाळीचे पॅकेट वाटप करण्यात येणार असल्याची माहिती दिली.

जीवाचा थरकाप उडवणाऱ्या घटनेनं अख्खा महाराष्ट्र हादरला आहे. इर्शाळवाडी येथे झालेल्या दुर्घटनेत पुरुष, महिला, लहान मुले, पाळीव प्राणी यांच्यासह सर्वच मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली.या सर्वांना गुरुवारची सकाळ पाहताच आली नाही. मध्यरात्रीपासूनच बचावकार्याला सुरुवात झाली मात्र अंधार असल्याने बचावकार्य थांबवण्यात आले.आता बचावकार्य सुरू झाले असून सध्या ८० जणांना रेस्क्यू करण्यात आलं असून पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तर ७० ते ८० जण अद्याप बेपत्ताच असल्याची माहिती मिळत आहे.

हे ही वाचा:

संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर अटकेत

मणिपूरच्या घटनेमुळे मोदी संतापले

इर्शाळवाडी दुर्घटना: मदतकार्यावर मुख्यमंत्र्यांचे ऑन फिल्ड उपस्थित राहून लक्ष

इर्शाळवाडी दुर्घटनाग्रस्त जखमींची अदिती तटकरेंनी घेतली भेट

इर्शाळवाडी येथे झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मंत्री छगन भुजबळ यांनी मंत्रालयातील दालनात अन्न, नागरी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली आणि तातडीने मदत पुरविण्याचे आदेश दिले. आजूबाजूच्या शिवभोजन केंद्रावरून हे पॅकेट देण्यात येणार आहे. शिवाय ५ लिटर रॉकेल, १० किलो तांदूळ, १० किलो गहू किंवा त्याचे पीठ, तूरडाळ, तेल, साखर देखील देण्यात येणार असल्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी जाहीर केले आहे. जोपर्यंत परिस्थिती पूर्वपदावर येत नाही तोपर्यंत हा पुरवठा सुरूच राहणार असल्याचे सांगतानाच छगन भुजबळ यांनी रायगड जिल्हाधिकारी यांना तातडीने याबाबतचे आदेश दिले आहेत.

Exit mobile version