‘आयुष्मान भव’ योजनेंतर्गत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमामधून जिल्ह्यातील ४६ बालकांवर मोफत हृदय शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. एस.आर.सी.सी. रुग्णालय, मुंबई येथे या बालकांवर हृदय शस्त्रक्रिया होणार आहेत. बालकांच्या हृदय शस्त्रक्रिया, औषधोपचार, निवास, भोजन व्यवस्था या सर्व सोयी शासन मोफत करत आहे. त्यामुळे कोणीही चिंता करू नये. सर्व बालकांच्यावर शस्त्रक्रिया यशस्वी होवून ती तंदुरूस्त होवून येतील असा दिलासा देवून सांगलीचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी बालक व पालकांना शुभेच्छा दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालय येथून पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या उपस्थितीत हृदय शस्त्रक्रिया करण्यासाठी बालकांना स्वतंत्र बसने मुंबईकडे पाठविण्यात आले.
हेही वाचा..
आदित्य एल-१चे पृथ्वीच्या तिसऱ्या कक्षेत पाऊल !
‘आम्हाला तुमच्या सल्ल्याची गरज नाही’
ऋषी सुनक यांची पत्नीसह अक्षरधाम मंदिराला भेट !
मंत्री खडे म्हणाले, एस.आर.सी.सी. रुग्णालय, मुंबई येथील डॉक्टर मुलांच्या बॉडीचा फिटनेस बघून हृदय शस्त्रक्रिया करतील. ज्या मुलांच्या हृदय शस्त्रक्रियेसाठी काही अडचण आहे, अशा मुलांना औषधोपचार करून त्यांच्याही हृदय शस्त्रक्रिया यशस्वीपणे केल्या जातील. सर्व मुलांच्या हृदय शस्त्रक्रिया व्यवस्थित होतील याची काळजी डॉक्टर्स, हॉस्पीटल, प्रशासनाबरोबर आम्ही सर्वजण घेत आहोत. पालकांनी मुलांबरोबरच त्यांच्या तब्बेतीचीही काळजी घ्यावी. येत्या मंगळवारी किंवा बुधवारी एस.आर.सी.सी. रुग्णालयात येवून तेथील डॉक्टर्स यांच्याबरोबरही बालकांवर केल्या जाणाऱ्या हृदय शस्त्रक्रियेसंदर्भात चर्चा करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.