कर्नाटक विधानसभेतील विरोधी पक्षनेते आर अशोक यांनी कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (केएसआरटीसी) बसच्या तिकीट दरात १५ टक्क्यांनी वाढ केल्याबद्दल राज्य सरकारवर टीका केली आहे. या निर्णयाविरोधात भाजप शनिवारी (४ जानेवारी) राज्यव्यापी आंदोलन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कर्नाटक सरकारने बसच्या तिकीट दरामध्ये १५ टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन बस भाडे ५ जानेवारीपासून लागू होणार आहे. मात्र, यावरून विरोधी पक्ष भाजपकडून सरकारवर टीका करण्यात येत आहे. यावर विरोधी पक्षनेते आर अशोक म्हणाले, पत्नींसाठी बस मोफत करण्यात आल्या असून पतींचे भाडे दुप्पट करण्यात आले आहे.
सरकारची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. परिवहन विभागाला चार हजार कोटींहून अधिक रक्कम देणे बाकी आहे, त्यांच्याकडे पैसे नाहीत. त्यामुळेच ते करण्यात आले आहे. याप्रश्नी मी शुक्रवारी आंदोलन करणार असल्याचे विरोधी पक्षनेते आर अशोक यांनी सांगितले. भाजप शनिवारी (४ जानेवारी) राज्यव्यापी निदर्शने करणार आहे.
हे ही वाचा :
रेल्वे रुळावर पडला होता लोखंडी दरवाजा; रेल्वे उलटवण्याचा होता कट!
सपा खासदार बर्क यांना दणका; एफआयआर रद्द होणार नाही
फिलिपाईन्स, व्हिएतनामनंतर इंडोनेशिया भारताकडून खरेदी करणार ‘ब्राह्मोस’!
मुंब्र्यात मराठी माणसाला माफी मागायला लावली! मनसेची मराठी माणसाला हाक
भाजपचे आमदार धीरज मुनिराजू यांनी काँग्रेस सरकार जनतेला लुटत असल्याचा आरोप केला. मुनिराजू म्हणाले की, सरकार जनतेवर कोणतेही उपकार करत नाही. लोकांना २ हजार रुपये दिले जात आहेत, मात्र शहरी लोकांकडून २० हजार रुपये तर गावकऱ्यांकडून ५ हजार ते सहा हजार रुपये घेतले जात आहेत. सरकार जनतेची लूट करत आहे. महिलांना बसमधून मोफत प्रवास करण्याची सुविधा दिली जात आहे. तर पुरुषांकडून दुप्पट भाडे आकारले जात आहे.
दरम्यान, केएसआरटीसी बसेसच्या तिकीट दरात १५ टक्के वाढ करण्यास राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्याची घोषणा कर्नाटकचे मंत्री एच के पाटील यांनी गुरुवारी (२ जानेवारी) केली. तिकीट दरातील ही वाढ ५ जानेवारी २०२५ पासून लागू होणार आहे. इंधनाच्या किमतीत वाढ आणि कर्मचाऱ्यांवरील खर्च यासारख्या ऑपरेटिंग खर्चात झालेली प्रचंड वाढ लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला असल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले.