बनावट तिकीट तपासनीसांचीच झाली तपासणी

बनावट तिकीट तपासनीसांचीच झाली तपासणी

रेल्वे प्रवासावर अजूनही निर्बंध आहे, त्यामुळे सर्वांनाच लोकलप्रवास मुभा नाही. परंतु खास मुंबईकरांसाठी लोकल ही सोयीची असल्यामुळे बहुतांशी नागरिक लोकलचाच वापर करतात. सध्या लोकल प्रवास मुभा नसल्याने, अनेकांना तिकिटाशिवाय प्रवास करणे भाग पडत आहे. अशा परिस्थितीत काही लोकांनी बनावट टीसी बनून लोकांना टोप्या घालण्यास सुरुवात केलेली आहे.

गेल्या ८ महिन्यांत मध्य रेल्वेने असे ५ बनावट तिकीट तपासनीस पकडले आहेत. आरपीएफ तसेच जीआरपीच्या मदतीने मुंबई विभाग, मध्य रेल्वेच्या तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांनी गेल्या ८ महिन्यांत म्हणजे जानेवारी ते ऑगस्ट २०२१ दरम्यान उपनगरीय स्टेशन/गाड्यांमधून ५ बनावट तिकीट तपासनीस पकडले. अलीकडेच १३ ऑगस्ट २०२१ रोजी, प्रमुख टीसी सुखवीर जाटव यांना दादरच्या प्लॅटफॉर्म क्रमांक५ वर एक व्यक्ती प्रवाशांची तिकिटे तपासताना आढळली. त्यांना संशय आला आणि त्यांनी संबंधित व्यक्तीला ओळखपत्र दाखवण्यास सांगितले. त्या व्यक्तीने पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण त्याला पकडण्यात आले. त्यानंतर या व्यक्तीला पुढील कारवाईसाठी जीआरपीच्या ताब्यात देण्यात आले.

दुसऱ्या घटनेत ४ ऑगस्ट २०२१ रोजी ०२५३८ डीएन कुशीनगर एक्सप्रेस स्पेशलच्या डी १ डब्यातील एक व्यक्ती पैसे घेऊन प्रवाशांना पावती देत होता. सीनियर टीटीई अनंत कुमार यांनी चौकशी केली आणि त्यांना आढळले की, तो बनावट टीसी आहे आणि त्याच्याकडे डुप्लिकेट ईएफआर आहे. त्याला जीआरपीकडेही सोपवण्यात आले. यापूर्वी २८ एप्रिल २०२१ रोजी टीटीई/सीएसएमटी हरिमंगल यादवने कल्याण स्टेशनवर ०१०७१ कामयनी एक्स्प्रेस स्पेशलच्या डी १ डब्यात बनावट टीसी पकडला.

हे ही वाचा:

भविष्यात पेट्रोल-डिझेल हद्दपार करा!

आता श्रीकृष्णजन्मभूमीवर भव्य मंदिराची प्रतीक्षा

त्यांच्या जिद्दीला सलाम..

भारताशी व्यापार करायला तालिबान उत्सुक

१५ मार्च २०२१ रोजी कुर्लाचे प्रमुख टीसी कुर्ला सिकंदरजित सिंग यांनी सायन स्टेशनवर बनावट टीसी पकडण्यात आला. त्याच दिवशी राजू गुजर, सीनियर टीसी, सँडहर्स्ट रोड स्टेशनवरही बनावट टीसी पकडला. वरील सर्व बनावट टीसींना आता पुढील कारवाईसाठी जीआरपीला देण्यात आले आहे. तसेच त्यांच्याविरोधात आयपीसीच्या विविध कलमांखाली एफआयआरही नोंदवण्यात आला आहे.

मध्य रेल्वेने प्रवाशांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. तसेच कोणत्याही संशयास्पद बनावट टीसीची माहिती तत्काळ रेल्वे पोलिस अधिकाऱ्यांना द्यावी असे आवाहन आता प्रवाशांना रेल्वे प्रशासनकडून करण्यात येत आहे.

Exit mobile version