संपूर्ण भारतीय बनावटीच्या वेगवान गाडीला चालना देण्यासाठी सरकारकडून नव्या कार्यक्रमाची आखणी करण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत देशातील ४० शहरांना वंदे भारत गाडीने जोडण्याची योजना आखली आहे. ऑगस्ट २०२२ पर्यंत ही योजना पूर्णत्वास नेण्याचा सरकारचा मानस आहे.
नव्याने रेल्वे मंत्री पदाचा कारभार स्वीकारल्यानंतर केंद्रीय रेल्वे मंत्री अश्वीनी वैष्णव यांनी हा निर्णय घेतला आहे. भारताच्या स्वातंत्र्याची ७५ वर्षे साजरी करताना मंत्री महोदयांनी हा निर्णय घेतला आहे. भारतीय रेल्वेतील आमुलाग्र बदल दर्शविण्यासाठी येत्या काळात हा प्रकल्प पूर्णत्वास नेण्याचा निर्णय मंत्री महोदयांनी घेतला आहे.
हे ही वाचा:
हँग झालेल्या वेबसाईटचीही आता चौकशी होणार
शाब्बास! लडाखमध्ये चार नवे विमानतळ आणि ३७ हेलिपॅड
चेंबूरच्या किंकाळ्या आधी ‘दिल्लीत’ नंतर ‘मुंबईत’ ऐकू आल्या!
वारकऱ्यांसाठी पंढरपूरची एकही एसटी नाही
याच योजनेच्या पूर्ततेसाठी हैदराबादच्या मेधा या कंपनीला त्यांचे उत्पादन वाढवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. निदान दोन प्रारूप गाड्या पुढील मार्चपर्यंत निर्माण करण्यात याव्यात यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. या कंपनीला ४४ वंदे भारत गाड्यांमधील विद्युत यंत्रणा बसविण्याचे कंत्राट देण्यात आले आहे. मंत्री महोदयांच्या या योजनेला मूर्तरूप देण्यासाठी रेल्वे बोर्डाने तातडीने बैठक घेतली आणि या योजनेला अंमलात आणण्यासाठी युद्धपातळीवरील आराखडा तयार करण्यात आला.
वंदे भारत ही अत्याधुनिक, संपूर्ण भारतीय बनावटीची जलदगती गाडी आहे. ही इंजिनशिवाय चालणारी रेल्वे असून सध्या दिल्ली ते वाराणसी या स्थानकांदरम्यान सेवा देण्यासाठी वापरली जाते.