खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येप्रकरणी कॅनडाच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी(११ मे) चौथ्या संशयित भारतीय नागरिकांना अटक केली आहे.कॅनडाच्या अधिकाऱ्यांनी या अटकेबाबत पुष्टी केली आहे. अधिकृत महिती देताना अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, इंटिग्रेटेड होमिसाईड इन्व्हेस्टिगेशन टीम (IHIT) द्वारा अमनदीप सिंगला (२२) अटक करण्यात आली आहे.अटक करण्यात आलेल्या अमनदीप सिंगवर खलिस्तानी दहशतवादी निज्जरची हत्या आणि हत्येचा कट रचल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.
इंटिग्रेटेड होमिसाईड इन्व्हेस्टिगेशन टीमने सांगितले की, अमरदीप सिंग ब्रॅम्प्टन, सरे आणि ॲबॉट्सफोर्ड येथे राहणारा एक भारतीय नागरिक आहे.त्याला निज्जरच्या हत्येतील भूमिकेसाठी ११ मे रोजी अटक करण्यात आली होती.अटक करण्यात आलेला अमरदीप सिंग हा बंदुक बाळगल्याच्या आरोपावरून ओंटारियोमध्ये आधीच कोठडीत होता.आयएचआयटीचे प्रभारी अधिकारी मनदीप मुकर म्हणाले की, हरदीपसिंग निज्जरच्या हत्येमध्ये ज्यांनी भूमिका बजावली त्यांच्यापर्तंत पोहोचणे आणि त्यांना अटक करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान, आतापर्यंत झालेली अटक हा त्या कारवाईचाच भाग आहे.
हे ही वाचा:
लाल चौकाने बदलले रूपडे; फडकतोय भारताचा तिरंगा, नांदते शांतता, ग्रेनेड नाही, रक्त नाही
पीओकेत महागाईचा हाहाकार, नागरिक सुरक्षा दलासोबत भिडले, पोलिसाचा मृत्यू!
‘उद्धव ठाकरेंना १९९९ पासूनच मुख्यमंत्री पदाची स्वप्न पडू लागली होती’
उद्धव ठाकरेंची मुलाखत म्हणजे ‘काळू बाळूचा तमाशाच’
दरम्यान, अमनदीप सिंग याच्यासह आतापर्यंत चार जणांना या प्रकरणात कॅनडा येथे अटक झाली आहे. यामध्ये करण ब्रार (२२), कमलप्रीत सिंग (२२), आणि करणप्रीत सिंग (२८) आणि अमनदीप सिंग (२२) अशी चार जणांची नावे आहेत. या सर्वांवर निज्जरच्या हत्येचा आरोप ठेवण्यात आला आहे.