दुमजली इमारतीला लागलेल्या आगीत चार कामगार जखमी

दुमजली इमारतीला लागलेल्या आगीत चार कामगार जखमी

दिल्लीतील एका दुमजली इमारतीला सकाळी ८.१६ वाजता आग लागून झालेल्या स्फोटामुळे चार कामगार जखमी झाल्याची घटना घडली. दक्षिण-पश्चिम दिल्लीतील नजफगढ येथील नमकीन कारखान्यात शनिवारी सकाळी आग लागल्याने झालेल्या स्फोटात चार कामगार जखमी झाले आहेत.

दिल्ली अग्निशमन सेवा अधिकाऱ्याने सांगितले की, आगीबाबत सकाळी ८.१६ वाजता कॉल आला आणि १७ अग्निशमन दलांना तिथे पाचारण करण्यात आले. ही दोन मजली इमारत असून तळमजल्यावर आग लागल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा..

डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर थोड्याच वेळात अंत्यसंस्कार होणार

आगीमुळे झालेल्या स्फोटात कारखान्यात असलेले चार कामगार जखमी झाले. त्यांना दीनदयाळ उपाध्याय रुग्णालयात उपचारार्थ नेण्यात आले, असेही त्यांनी सांगितले. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

Exit mobile version