हिमाचलमध्ये १८ हजार फुटांवर बंगालचे चार पर्यटक झाले बेपत्ता

ड्रोनच्या सहाय्याने घेणार शोध

हिमाचलमध्ये १८ हजार फुटांवर बंगालचे चार पर्यटक झाले बेपत्ता

हिमाचल प्रदेशातल्या कुल्लू जिल्ह्यात १८,००० फूट उंचीवर असलेल्या माऊंट अली रत्नी टिब्बा येथून ट्रेकिंगसाठी गेलेले पश्चिम बंगालमधील चार पर्यटक बेपत्ता झाले आहेत. बेपत्ता सदस्यांच्या माहितीसाठी टीमसोबत गेलेला कूक मलाना आणि दाेन सदस्य परत आले आहे. त्यांनी आपल्या टीममधील चार सदस्य बेपत्ता झाल्याची माहिती प्रशासनाला दिली आहे. यानंतर बचाव पथक रवाना करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बंगालचे पर्यटक अभिजित बनिक (४३), चिन्मय मंडल (४३), दिबाश दास (३७) आणि बिनॉय दास (३१) हे माउंट अली रत्नी टिब्बा येथून ट्रेकिंगसाठी गेले होते. कुक रंजन दासही त्याच्यासोबत होता. रंजन दास यांनी सांगितले की, ट्रॅकिंग दरम्यान त्यांच्यासोबत असलेले लोक बेपत्ता झाले आहेत. तो कसा तरी परत मलाणा येथे पोहोचला आणि घटनेची माहिती जिल्हा प्रशासनाला दिली.

जिल्हा प्रशासनाने अटलबिहारी पर्वतारोहण संस्था मनालीचे पथक बचावकार्यासाठी घटनास्थळी पाठवले आहे. टीम रवाना झाली असून ते बचाव कार्यातून परत आल्यानंतरच काही सांगता येईल असे एसडीएम कुल्लू विकास शुक्ला यांनी सांगितलं. बेपत्ता झालेल्या चार गिर्यारोहकांचा शोध घेण्यासाठी स्थानिक बचाव पथकाचीही मदत घेतली जात आहे. शोधकार्यात गेलेल्या बचाव पथकांना सॅटेलाइट फोनही देण्यात आले आहेत.

हे ही वाचा:

डायमंड लीग जिंकणारा नीरज चोप्रा पहिला भारतीय

गणेश भक्तांसाठी मध्य रेल्वेकडून विशेष लोकल फेऱ्या

गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या… दहा दिवसांच्या बाप्पाला निरोप

पंतप्रधान मोदींनी सांगितली दुसऱ्या एलिझाबेथ यांच्या भेटीची आठवण

अनेक बचाव कार्य यशस्वीपणे पार पाडणाऱ्या कुल्लू जिल्ह्यातील रेक्स्यू तज्ज्ञ रायड राम यांनी सांगितले की, हा १८ हजार फूट उंच शिखराचा ट्रेक अतिशय कठीण आहे. बेपत्ता गिर्यारोहकांचा लवकरच शोध घेता यावा यासाठी ड्रोनची मदत घ्यावी, असा सल्ला त्यांनी बचाव पथकाला दिला. १५ सदस्यीय बचाव पथकात नारायण दत्त, स्की संस्थान, दीना नाथ, भूमी देव शर्मा, पूरण चंद, देवी सिंह, चमन लाल, शिव, शेरसिंग यांच्यासह दोन स्वयंपाकींचा समावेश आहे.

Exit mobile version