23 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरविशेषवाँटेड तस्कर हाजी सलीमच्या सिंडिकेटशी संबंधित चार हजार किलोग्राम अंमली पदार्थ जप्त

वाँटेड तस्कर हाजी सलीमच्या सिंडिकेटशी संबंधित चार हजार किलोग्राम अंमली पदार्थ जप्त

अनेक पाकिस्तानी नागरिकांना अटक

Google News Follow

Related

“ड्रग्सचा लॉर्ड” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाँटेड तस्कर हाजी सलीमच्या मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांचे साम्राज्य उखडून टाकण्यासाठी सरकारने “ऑपरेशन सागर मंथन” ही मोठी मोहीम सुरू केली आहे. अधिका-यांच्या म्हणण्यानुसार, शोध सुरू करण्याचे आदेश थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून आले आहेत.

ऑपरेशन्स अंतर्गत अधिकाऱ्यांनी आतापर्यंत सलीमच्या तस्करी सिंडिकेटशी संबंधित ४ हजार किलोग्राम अंमली पदार्थ जप्त केले आहेत. या प्रकरणात अनेक पाकिस्तानी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. हे ड्रग्स पाकिस्तानची गुप्तचर संस्था इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजन्स (ISI) च्या सांगण्यावरून भारतात पाठवली गेली.

हेही वाचा..

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नायजेरियात स्वागत

रामेश्वरम कॅफे हल्ल्यातील आरोपींचे आयएसआयएसशी संबंध

अल्ला हू अकबरचे नारे, घाणेरडे इशारे, थुंकण्याचा प्रयत्न अन खुर्च्या फेकल्या!

हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

आयएसआय व्यतिरिक्त हाजी सलीमचा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशीही संबंध आहे. त्याचे नाव यापूर्वी कोट्यवधी रुपयांच्या ड्रग्ज प्रकरणात समोर आले होते. सलीमचा पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील हेरॉइनच्या व्यापाराशी संबंध आहे. तो पाकिस्तानातून दाऊद इब्राहिमच्या आंतरराष्ट्रीय ड्रग ऑपरेशन्सचे व्यवस्थापन करतो असे म्हटले जाते.

भारतातील नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) आणि मॉरिशस, श्रीलंका आणि मालदीवसह अनेक देशांतील कायदा अंमलबजावणी संस्थांकडून त्याची चौकशी सुरू आहे. अधिकाऱ्यांनी त्याच्या अनेक ड्रग्ज कन्साईनमेंट्स रोखल्या आहेत, ज्या अनेकदा सागरी मार्गाने पाठवल्या जातात. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंग म्हणाले, हाजी सलीम हा जगातील सर्वात मोठ्या ड्रग तस्करांपैकी एक आहे. जो एका जटिल नेटवर्कद्वारे हेरॉईन, मेथॅम्फेटामाइन आणि इतर बेकायदेशीर अंमली पदार्थांचा मोठ्या प्रमाणात पुरवठा करतो. हे सगळे आशिया, आफ्रिका आणि पश्चिमेमध्ये पसरलेले आहे. तपास अद्याप प्राथमिक टप्प्यावर आहे.

सलीमचे नेटवर्क अंमली पदार्थ-दहशतवादाच्या कारवायांशी जोडलेले आहे. त्यामुळे प्रदेश अस्थिर होतो. त्याचे ड्रग्ज हे केवळ समाजासाठीच धोका नाही तर सीमेपलीकडील दहशतवादी कारवायांसाठी निधी देखील पुरवतात, असे सिंग म्हणाले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा