मोहरमच्या मिरवणुकीत विजेचा शॉक लागून चौघांचा मृत्यू

१० जण भाजले

मोहरमच्या मिरवणुकीत विजेचा शॉक लागून चौघांचा मृत्यू

झारखंड मधील बोकारो जिल्ह्यात मोहरमच्या मिरवणुकीत शनिवार, २९ जुलै रोजी मोठी दुर्घटना झाली आहे. मिरणणुकीदरम्यान ताजियाचा विद्युत तारेशी संपर्क आल्याने चार जणांचा मृत्यू झाला असून १० जण भाजल्याने गंभीर जखमी झाले आहेत.

झारखंडमधील बोकारोमधील पीतेरवार ब्लॉक येथील खेतको गावात मोहरमची मिरवणूक निघाली होती. या मिरवणुकीत मोठी दुर्घटना घडली. सकाळी ६ च्या सुमारास ही दुर्घटना घडली. मोहरममध्ये सर्वजण ताजिया घेऊन जात असताना ११ हजार व्होल्टच्या वायरमध्ये अडकले.

उपस्थित असलेल्या नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, ताजिया उचलत असताना वरून जाणारी ११ हजार व्होल्टची हायटेंशन लाईन ताजियामध्ये अडकली, त्यामुळे ताजियाच्या मिरवणुकीत ठेवलेल्या बॅटरीचा स्फोट झाला. यामुळे अनेक लोक गंभीररित्या होरपळले. स्थानिक लोकांच्या मदतीने जखमींना तातडीने डीव्हीसी बोकारो थर्मल हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले. त्यातील काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.

गंभीररित्या जखमी झालेल्या चौघांचा मृत्यू झाला असून इतर नऊ जखमींची प्रकृती अद्याप चिंताजनक आहे. तसेच यावेळी रुग्णालयात रूग्णवाहिका नसल्याने आणि रूग्णालयातील एकंदर संथ कारभारामुळे लोकांनी गोंधळ घातला होता.

हे ही वाचा:

मलकापूरमध्ये दोन ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात; सात प्रवाशांचा मृत्यू

बंगालच्या उपसागरात अडकलेल्या ३६ मच्छिमारांची भारतीय नौदलाकडून सुटका

खांद्यात लागलेली गोळी घेऊन ६०० किमी प्रवास, गुन्हा दाखल होऊ नये म्हणून धावपळ

पुरोगामी कुबेरगिरी कोरड्या ओकाऱ्या

काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये अशीच एक धक्कादायक घटना घडली होती. कावड यात्रेकरूंना नेणाऱ्या एका वाहनाला हाय व्होल्टेज वायर अडकल्याने भाविकांना विजेचा धक्का बसला. यामध्ये पाच कावडियांचा मृत्यू झाला, तर काही जखमी झाले होते.

Exit mobile version