भारतातील चार पाणथळ ठिकाणांचा रामसर यादीत समावेश

भारतातील चार पाणथळ ठिकाणांचा रामसर यादीत समावेश

भारतातील चार पाणथळ ठिकाणांचा आंतरराष्ट्रीय दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या रामसर यादीत समावेश करण्यात आला आहे. यामध्ये गुजरात मधील थोल आणि वाधवाना, तर हरियाणातील सुल्तानपूर आणि भिंडवास या स्थळांचा समावेश आहे. या स्थळांना रामसर ठिकाणे म्हणून रामसर कार्यालयाने मान्यता दिली आहे.

यामुळे आता भारतात रामसर स्थळांची संख्या ही ४६ वर गेली आहे आणि या स्थळांद्वारे व्याप्त क्षेत्रफळ आता १०,८३,३२२ हेक्टर आहे. सुलतानपूर आणि भिंडवास ही हरियाणातील पहिली रामसर स्थळे म्हणून नोंदवली गेली आहेत, तर गुजरामधे २०१२ मध्ये घोषित झालेल्या नल सरोवर नंतर आणखी यामध्ये पुन्हा एकदा गुजरात मधील पाणथळ क्षेत्रांना रामसार यादीत स्थान मिळाले आहे.

हे ही वाचा:

बडोद्यातील मंदिरांना लाऊड स्पीकर वाटप

कोकणातील महापुरात उद्योग गेला वाहून

गोवंश टिकवा, संस्कृती टिकवा!

फेलिक्सने दाखवून दिली प्रायोजकांना त्यांची ‘जागा’

केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी ट्वीटर संदेशाद्वारे याची माहिती देऊन ​​आनंद व्यक्त केला. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या विषयी आनंद व्यक्त करत ट्विट केले आहे. भारतीय पाणथळ क्षेत्रांना रामसार यादीत स्थान मिळणे ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. यामुळे भारताचा शतकांपासून चालत आलेला नैसर्गिक अधिवास जतन करण्याचा वरसा तसेच वनस्पती आणि प्राणी संरक्षणाच्या दिशेने काम करणे या गोष्टींचे महत्व अधोरेखित करते.

Exit mobile version