28 C
Mumbai
Wednesday, January 1, 2025
घरविशेषअजून चार राफेल भारतात दाखल होणार

अजून चार राफेल भारतात दाखल होणार

Google News Follow

Related

अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त अशी आणखी चार राफेल विमाने भारतीय हवाई दलात दाखल होणार आहेत. त्यामुळे भारतीय हवाई दल हसीमारा, पश्चिम बंगाल येथे राफेल विमानांची दुसरी स्क्वाड्रन तैनात करण्यास सिद्ध झाले आहे. ही विमान फ्रान्सहून भारतात १९ किंवा २० मे रोजी भारतात दाखल होतील.

भारतीय हवाई दलाकडे आत्तापर्यंत एकूण २० राफेल पोहोचली आहेत. या चारांची त्यात भर पडल्यानंतर भारतीय हवाई दलाकडील राफेल विमानांची संख्या वाढून थेट २४ वर जाणार आहे. त्याशिवाय इतर सातांचे फ्रान्समध्ये अजून प्रशिक्षण चालू आहे.

हे ही वाचा:

मुंबईत आज-उद्या लसीकरण बंद ठेवून काय वीकेंड साजरा करायचा आहे का?

कोरोना चाचण्यांच्या आकडेवारीचा फुगा फुटला

पब्लिक सब जानती है…देवेंद्र फडणवीसांचे सोनिया गांधींना पत्र

सावरकरांना माफीवीर म्हणणाऱ्यांचा माफीनामा

याबाबत बोलताना एअर मार्शल म्हणाले की,

हसीमारा विमानतळाचे संपूर्णपणे नुतनीकरण पूर्ण झाले आहे आणि या महिनाअखेरपर्यंत तो कार्यान्वित होणे अपेक्षित आहे. ही विमानांची शांतताकाळातील जागा आहे, परंतु युद्धकाळात विमाने संपूर्ण देशातून नियोजित ठिकाणांहूनच उड्डाण करतील. नजरेच्या टप्प्यापलीकडील लक्ष्याचा भेद करण्याची क्षमता भारताच्या एकाही शत्रूकडे नसल्याने राफेल विमानाची उपलब्धता ही ‘गेम चेंजर’ ठरणार आहे.

त्याशिवाय भारतीय हवाई दलाने १२६ मिडीयम मल्टीरोल कॉम्बॅट एअक्राफ्टची (एमएमआरसीए) निकड देखील वेगाने पूर्ण करण्याचे ठरवले आहे. त्यासाठी फ्रान्समधील सफ्रान या उद्योगाने भारताला विमानाचे इंजिन एकत्रीतपणे विकसित करण्यासाठी इच्छा प्रकट केली आहे.

राफेल ही दसॉल्ट या फ्रेंच कंपनीचे उत्पादन असलेले अत्याधुनिक लढाऊ विमान आहे. सप्टेंबर २०१६ मध्ये सुमारे ५८,००० कोटी रुपयांना अशी ३६ राफेल विमाने खरेदी करण्याबाबत सरकारी पातळीवरून एक करार करण्यात आला.

राफेल हे ४.५ व्या पीढीचे लढाऊ विमान आहे. त्यामुळे हे विमान नजरेच्या टप्प्याबाहेरील लक्ष्याचा भेद करण्यास देखील सक्षम असलेले विमान आहे. एका उड्डाणामध्ये चार मिशन्स पूर्ण करण्याची क्षमता असलेले हे अत्यंत शक्तिशाली विमान आहे. या विमानावर हॅमर सारखी नजरेच्या टप्प्याबाहेरील लक्ष्याचा वेध घेणारी क्षेपणास्त्रे देखील लादली जाऊ शकतात.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
219,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा