उत्तर इंग्लंडमधील पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या बंगल्याच्या आवारात प्रवेश करून अतिक्रमण केल्याच्या संशयावरून ब्रिटिश पोलिसांनी मंगळवारी चार जणांना अटक केली, असे पोलिसांनी एका निवेदनात म्हटले आहे. सध्या ब्रिटनमध्ये सार्वत्रिक निवडणुकीचा प्रचार सुरू आहे. सुनक हे मध्य-डाव्या मजूर पक्षाकडून लढत आहेत.
‘आम्ही आज दुपारी पंतप्रधानांच्या मतदारसंघातील त्यांच्या घराच्या आवारातून चार जणांना अटक केली आहे,’ असे निवेदन नॉर्थ यॉर्कशायर पोलिसांनी जाहीर केले आहे. या चार जणांनी अतिक्रमण केल्यानंतर एका मिनिटाच्या आतच आमच्या अधिकाऱ्यांनी त्यांना ताब्यात घेतले,’ असे ते म्हणाले.
हे ही वाचा:
प्रेमजाळ्यात अडकवून एका हिंदू अल्पवयीन मुलीचा विनयभंग!
केनियात करवाढीला विरोध करताना संसद भवनावर हल्ला, १० ठार
तामिळनाडू विषारी दारू प्रकरण; मृतांची संख्या पोहचली ५६ वर!
कॉलेजमध्ये हिजाब हवा म्हणणाऱ्या मुलींची याचिका फेटाळली
२० ते ५२ वयोगटातील आणि देशाच्या विविध भागांतून आलेल्या या संशयितांना चौकशीसाठी पोलिस कोठडीत आणण्यात आले असून त्यांची चौकशी सुरू आहे, असे पोलिसांनी सांगितले. युथ डिमांड या गटाने ‘एक्स’वर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये एक तरुण एका घराच्या आवारात शिरताना आणि त्यात लघवी करताना दिसत आहेत. हा तलाव सुनक यांच्या घराच्या मालमत्तेचा भाग आहे.
सुनक यांच्या घराला लक्ष्य करण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या उन्हाळ्यात, ग्रीनपीस कार्यकर्त्यांनी नवीन तेल आणि वायू परवाने देण्याच्या कंझर्व्हेटिव्ह सरकारच्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी त्यांचे घर काळ्या कापडाने झाकले होते.