उत्तर प्रदेशमधील नोएडा येथे बांधकाम सुरु असलेली भिंत कोसळून मोठा अपघात झाला आहे. या अपघातात चौघांचा मृत्यू झाला आहे. तसेच या कोसळलेल्या भिंतीखाली काही लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरु आहे.
उत्तर प्रदेशमधील नोएडा येथील जल वायू विहारमध्ये पॉवर हाऊससमोर ही भिंत पडली आहे. या अपघातात चार जणांना जीव गमवावा लागला आहे. तर अनेक जण जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती डीएम सुहास एलवाय यांनी दिली आहे.
#WATCH | UP: Rescue operations underway in Noida Sector 21 where a wall collapsed this morning.
DM Suhas LY says, "We have received info of 2 deaths each (total 4) at District Hospital & Kailash Hospital, it is being verified. We're also ascertaining details on the injured." pic.twitter.com/FTXAVVvarm
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) September 20, 2022
भिंतीलगत नाल्याच्या दुरुस्तीचे काम सुरु होते त्यादरम्यान भिंत सुमारे दोनशे मीटर खाली पडल्याने हा अपघात झाला आहे. अपघात घटनेच्या वेळी या ठिकाणी बारा मजूर काम करत होते. घटना घडताच स्थानिकांनी पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर घटनास्थळी पोलीस आणि बचाव पथक पोहचले असून, ढिगारा हटवण्याचे काम सुरु आहे. सध्या तीन जेसीबीच्या सहाय्याने मातीचा ढिगारा बाजूल करण्याचे काम सुरू असून, ढिगाऱ्याखाली कुणी अडकले आहेत का? याचा शोध सुरू आहे.
हे ही वाचा:
पत्राचाळ प्रकरणातून मिळालेल्या पैशात संजय राऊत परदेश दौऱ्यावर गेले
“मास्क न वापरलेल्यांकडून कायद्याच्या कोणत्या तरतुदीनुसार दंड वसूल करण्यात आला?”
बायबलच्या ओळी वाचून पंतप्रधान ट्रस यांनी दिला एलिझाबेथना निरोप
अमरिंदर यांच्यासह त्यांचा पक्षही भाजपात विलिन
नोएडाचे डीएम सुहास एलवाय यांनी या प्रकरणाची माहिती दिली आहे. नोएडा सेक्टर २१ मधील जलवायू विहाराजवळ ड्रेनेज दुरुस्तीचे काम सुरु होते. यावेळी मजूर विटा काढत असताना भिंत कोसळून हा अपघात झाला आहे. या अपघातात चार मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या जिल्हा रुग्णालयात दोन आणि कैलास रुग्णालयात दोन अशा एकूण चार मृत्यूची नोंद झाली आहे, अशी माहिती सीएम सुहास यांनी दिली आहे.