गुजरात-राजस्थानमध्ये चार ड्रग मॅन्युफॅक्चरिंग लॅबचा पर्दाफाश!

२३० कोटी रुपयांची औषधे जप्त

गुजरात-राजस्थानमध्ये चार ड्रग मॅन्युफॅक्चरिंग लॅबचा पर्दाफाश!

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो ऑफ इंडिया (एनसीबी) आणि गुजरात एटीएस टीमला मोठं यश मिळालं आहे.पथकाच्या संयुक्त कारवाईत राजस्थान आणि गुजरातमध्ये छापा टाकत २३० कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. दोन्ही राज्यांतून जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थांचा प्रचंड साठा पाहून एनसीबीचे अधिकारी आश्चर्यचकित झाले आहेत.

गुजरातचे डीजीपी विकास सहाय म्हणाले की, एटीएसचे डीएसपी एसएल चौधरी यांना दोन महिन्यांपूर्वी याबाबत माहिती मिळाली होती की, अहमदाबादचे रहिवासी मनोहरलाल आणि गांधीनगरचे रहिवासी कुलदीप सिंग हे दोघे ड्रग बनवण्यासाठी कच्च्या मालाची खरेदी करून लॅबमध्ये एमडी ड्रग तयार करत आहेत.या माहितीच्या आधारे एटीएसने एनसीबीसोबत काम सुरू केले.त्यानंतर शनिवारी(२७ एप्रिल) पहाटे चार वाजता पथकाकडून धाडी टाकण्यास सुरुवात झाली.

हे ही वाचा:

जेक फ्रेझर-मॅक्गर्क, स्टब्ज, रसिक चमकले; दिल्लीची मुंबईवर मात

‘राजपुत्रामध्ये नवाब, निजाम, सुलतान आणि बादशाह विरोधात बोलण्याची ताकद नाही’

अदानी बंदराबाबत फेक बातमी पसरवणारा ‘तो’ व्हिडीओ गुजरातचा नाही इजिप्तचा !

आमीर खानला पंजाबमध्ये कळली ‘नमस्ते’ची ताकत

डीजीपी विकास सहाय पुढे म्हणाले की, एनसीबी आणि एटीएसच्या पथकाने शनिवारी जालोरमधील भीनमाल, जोधपूरमधील ओसियन आणि गांधीनगर आणि गुजरातमधील अमरेली येथे छापे टाकले. या छाप्यात राजस्थान-गुजरातमध्ये एकूण १३ जणांना अटक करण्यात आली.

त्यांच्या चौकशीच्या आधारे आता टोळीच्या मुख्य म्होरक्याचा शोध घेतला जात आहे. यासोबतच औषधांची निर्मिती करणाऱ्या ४ हायटेक लॅबचाही पर्दाफाश झाला आहे. तेथून एकूण १४९ किलो एमडी, ५० किलो इफेड्रिन आणि २०० लिटर ॲसिटोन जप्त करण्यात आले आहे. दरम्यान, चारही ठिकाणांहून जप्त करण्यात आलेल्या ड्रग्जची किंमत सुमारे २३० कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.

 

Exit mobile version