नाशिकमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. नाशिकमधील लहवित ते देवळाली स्थानकादरम्यान पवन एक्सप्रेसचे चार डबे रुळावरून घसरले आहेत. या भीषण अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू तर चार ते पाच जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबईहून निघालेल्या लोकमान्य टिळक टर्मिनस (कुर्ला) – जयनगर पवन एक्सप्रेस ही नाशिकला पोहोचण्याच्या आधी १२ किमी दूर अंतररावर या रेल्वेचा अपघात झाला आहे. या दुर्घटनेचे नेमके कारण अजून समोर आलेले नाही. एक्सप्रेसच्या अपघाताची घटना कळताच स्थानिक मदत कार्यसाठी धावून गेले. त्यांनतर रेल्वे पोलिस आणि वैद्यकीय पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.
Few coaches of 11061 LTT-Jaynagar Express have been derailed between Lahavit and Devlali (near Nashik) on Dn line at around 15.10 hrs today, April 3. Accident relief train and medical van rushed to the spot. Details awaited: Central railway CPRO
— ANI (@ANI) April 3, 2022
या दुर्घटनेत एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक प्रवाशी रुळांमध्ये अडकल्याची माहिती मिळाली आहे आणि ४ ते ५ प्रवासी जखमी झाले आहेत. या दुर्घटनेचा मुंबईहून भुसावळकडे जाणाऱ्या गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम झाला असून वाहतूक विस्कळीत झाली आहे. नाशिकचे निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांनी सांगितले की, त्यांनी नाशिकचे तहसीलदार आणि नाशिकचे उपविभागीय अधिकारी यांना बचाव आणि मदतीच्या उपाययोजना करण्यास सांगितले आहे.
हे ही वाचा:
काश्मीर फाईल्स विरोधात पुन्हा शरद पवारांची मळमळ
गतविजेत्या इंग्लंडला धूळ चारत ऑस्ट्रलियन महिलांनी सातव्यांदा उचलला विश्वचषक
शीतल कारुळकर यांना वूमेन्स अचिव्हर्स पुरस्कार
काश्मिरी पंडितांनी श्रीनगरमध्ये साजरा केला ‘नवरेह’ सण
अपघातानंतर काही प्रवासी रेल्वेमध्ये अडकून पडले आहेत. त्यामुळे रेल्वेकडून अपघातग्रस्त प्रवाशांसाठी हेल्पलाइन क्रमांक तात्काळ सुरु करण्यात आले आहेत. प्रवासी, हेल्पलाईन क्रमांक नाशिक ०२५३-२४६५८१६, CSMT स्टेशन टीसी ऑफिस – ५५९९३ आणि सीएसएमटी- ०२२२२६९४०४० या क्रमांकावर संपर्क साधून मदत मागू शकतात.