मुघल कालखंडात गुजरातमधील हजारो राजपूतांनी इस्लाम धर्म स्वीकारला होता. त्यामुळे त्यांना मोहरेइस्लाम गार्सिया म्हणतात. अशा सुमारे साडेचार लाख मोहरेइस्लाम गार्सिया यांना पुन्हा शुद्धीकरण शिबिराच्या माध्यमातून हिंदू धर्मात परत आणले जाणार आहे. त्यांना पुन्हा राजपूत समाजात प्रतिष्ठा मिळणार आहे.
मोहरेइस्लाम याचा अर्थ असा आहे की वरवर त्यांनी इस्लाम धर्म स्वीकारलेला असला तरी हृदयाने ते हिंदूच आहेत. हे लोक आपल्या घरी नमाजऐवजी आपल्या कुलदेवीची पूजा करतात. संदर्भात गुजरात राजपूत समाजाची एक बैठक झाली. या नंतर सुमारे साडेचार लाख मुस्लिमांनी हिंदू धर्मात परतण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
हेही वाचा..
नागपूर हिंसाचारातील मास्टरमाइंड फहीम खानच्या घरावर बुलडोझर
छत्तीसगडमध्ये २२ माओवाद्यांचे आत्मसमर्पण
गाझाच्या नास्सेर हॉस्पिटल संकुलात लपलेल्या दहशतवाद्यांवर इस्रायलचा हल्ला
वक्फ विधेयक नक्कीच पारित होणार
जर अशीच मोहीम इतर राज्यांमध्ये देखील राबवली गेली, तर त्याचे सकारात्मक परिणाम नक्कीच दिसून येतील. कारण औरंगजेब आणि अल्लाउद्दीन खिलजीच्या काळात जाट, गुर्जर, राजपूत, ब्राह्मण आणि दलित समाजातील अनेकांनी भीतीपोटी इस्लाम धर्म स्वीकारला होता. त्यामुळे त्यांचा विश्वास जिंकून त्यांना पुन्हा त्यांच्या मूळ धर्मात परत आणण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.