25 C
Mumbai
Saturday, November 23, 2024
घरविशेषबिपिन फुटबॉल अनाथ झाला! सुरेंद्र करकेरा यांचे निधन

बिपिन फुटबॉल अनाथ झाला! सुरेंद्र करकेरा यांचे निधन

वयाच्या ७१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Google News Follow

Related

आपल्या मुलाच्या स्मृत्यर्थ सुरू केलेल्या बिपिन फुटबॉल स्पर्धेसाठी अहोरात्र झटणारा, प्रसारमाध्यमांत स्पर्धेची ओळ न ओळ छापून आणण्यासाठी पाठपुरावा करणारा, या स्पर्धेच्या माध्यमातून युवा फुटबॉलपटूंसाठी एक व्यासपीठ उभे करणारा या खेळाचा निस्सीम कार्यकर्ता सुरेंद्र करकेरा यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मंगळवारी निधन झाले. त्यांच्या या अकाली निधनाने मुंबईतील फुटबॉलविश्वावर आभाळच कोसळले.

गेल्यावर्षाच्या अखेरच्या आठवड्यात करकेरा यांनी बिपिन फुटबॉल स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यासाठी नेहमीसारखी त्यांनी धावपळ केली. मात्र गेल्या काही वर्षांत प्रकृतीच्या कारणास्तव ही धावपळ त्यांना जमत नव्हती. तरीही सगळ्या तडजोडी करत त्यांनी स्पर्धा जिवंत ठेवण्यासाठी आटापीटा केला. पण ही त्यांनी आयोजित केलेली अखेरची स्पर्धा ठरेल अशी शंका कुणाच्याही मनात आली नाही.  ते ७१ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि सून असा परिवार आहे.

बिपीन पुटबॉल ऍकॅडमीच्या माध्यमातून गेली ३४ वर्षे सातत्याने आंतरकेंद्र फुटबॉल स्पर्धांचे आयोजन करणाऱया करकेरांबद्दल आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटूंपासून सामान्य कार्यकर्त्यांपर्यंत साऱयांच्याच मनात आदराची भावना होती. बिपिन फुटबॉल स्पर्धा म्हटली की त्याची बातमी प्रत्येक वर्तमानपत्रात अगदी आवर्जून घेतली जात असे. करकेरा यांनी गेल्या चार दशकांत सामान्य फुटबॉलपटूंसाठी आपले आयुष्य वेचले. खिशात पैसा नसतानाही ते स्वतःच्या खिशातून केवळ पैसाच काढायचे नाही तर फुटबॉलच्या दात्यांकडून, सामाजिक आणि कॉर्पोरेट कंपन्यांकडे झोळी पसरायचे. फुटबॉलची नि:स्वार्थ सेवा करणाऱया या कार्यकर्त्याने आपल्या उभ्या आयुष्यात अनेक गरीब-गरजूंना हात पकडून फुटबॉलचे प्रशिक्षण दिले. त्यांना शिक्षण घेता यावं म्हणून रात्रशाळेत त्यांना दाखल केले. त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न सुटावा म्हणून अनेकांना हॉटेल-कंपन्यांमध्ये नोकरीला लावले. यातून त्यांनी अनेक फुटबॉलपटू घडवले. अनेक फुटबॉलपटू हे या स्पर्धेचे साक्षीदार ठरले. काही स्पर्धेत खेळले तर काहींनी या स्पर्धेला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती दर्शवत करकेरा यांच्या या प्रयत्नांना साथ दिली.

गेल्या काही वर्षांत गुडघ्याचा प्रचंड त्रास त्यांना जाणवत होता. तरीही ठिकठिकाणी जात स्पर्धेच्या प्रसिद्धीसाठी ते धडपड करत होते. इंग्रजी, मराठीसह इतर भाषांतही आपल्या स्पर्धेची बातमी प्रसिद्ध व्हावी असा त्यांचा आग्रह असे.

हे ही वाचा:

सामनाच्या संपादकपदी रामसे ब्रदर्स?

जोशीमठमधील हॉटेलनंतर आता घरे पाडण्याचा निर्णय

शिवसेनेत फूट नाहीच; सिब्बल यांचा दावा तर जेठमलानी म्हणाले, पक्षातून बाहेर पडणे बेकायदेशीर कसे?

पदयात्रेत राहुल गांधींच्या गळ्यात एकाने घातले हात

करकेरांचा मुंबई फुटबॉलकडून गौरव

गरीब मुलांना फुटबॉलचे प्रशिक्षण मिळावे, त्यांच्यात फुटबॉलची आवड निर्माण व्हावी म्हणून गेली चार दशके बिपीन फुटबॉल ऍकॅडमीच्या माध्यमातून फुटबॉलची सेवा केल्याबद्दल सुरेंद्र करकेरा यांचा नुकताच मुंबई जिल्हा फुटबॉल संघटनेने जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान केला होता.

मुलाच्या स्मरणार्थ फुटबॉल प्रशिक्षणाचे आयोजन

आपला मुलगा बिपीन करकेराला रोव्हर्स कपचा सामना पहायचा होता, पण तो सामना दाखवण्याआधी त्याचे अपघातात निधन झाले. बिपीनच्या निधनाचा करकेरांना खूप मोठा मानसिक धक्का बसला होता. आपण मुलाची इच्छा पूर्ण करू शकलो नाही, त्याची आठवण म्हणून त्यांनी बिपीन मेमोरियल फुटबॉल स्पर्धा सुरू केली. या स्पर्धेनिमित्त ते पूर्ण मुंबई आणि आसपासच्या उपनगरात तज्ज्ञ फुटबॉल प्रशिक्षकांच्या माध्यमातून प्रशिक्षणाचे केंद्र तयार करायचे आणि प्रत्येक केंद्रात खेळाडूंना फुटबॉलचे प्रशिक्षण दिले जायचे. तसेच प्रत्येक केंद्राचा एक संघ तयार करून त्यांची फुटबॉल स्पर्धा आयोजित करायचे. हे गेले ३४ वर्षे आपल्या मुलाच्या स्मरणार्थ मोठ्या तळमळीने करत होते. त्यांच्या अकाली निधनामुळे बिपीन फुटबॉल ऍकॅडमी आणि गरीब-होतकरू फुटबॉलपटूंना खूप मोठा धक्का बसला आहे.

फुटबॉलचा धडपड्या कार्यकर्ता गेला

करकेरांची धडपड पाहून सर्वांनाच वाटायचे की आपण त्यांना मदत करायला हवी. त्यांना सर्वच मोठ्या मनाने मदत करायचे. त्यांची फुटबॉल आणि गरीब मुलांबाबत असलेली तळमळ पाहून आम्ही कर्नाटक स्पोर्टस् क्लबचे मैदान अगदी माफक दरात कायमस्वरूपी उपलब्ध करून दिले. तो ज्या तळमळीने फुटबॉल स्पर्धांचे आयोजन करायचा, त्याच्या धडपडीला सलाम. त्याच्या निधनानंतर बिपीन ऍकॅडमी आणि गरीब फुटबॉलपटू पोरके झाले आहेत, अशी प्रतिक्रिया शिवछत्रपती पुरस्कार विजेते कबड्डीपटू जया शेट्टी यांनी व्यक्त केली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
193,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा