मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ. स्नेहलता देशमुख यांचे निधन

मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ. स्नेहलता देशमुख यांचे निधन

प्रसिद्ध शल्यविशारद, शिक्षणतज्ज्ञ आणि मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ. स्नेहलता देशमुख (वय ८५) यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. सध्या त्या मुंबईच्या पार्ले टिळक विद्यालय संस्थेच्या संचालक मंडळ विश्वस्त म्हणून त्या कार्यरत होत्या.

बालरोगतज्ज्ञ म्हणून ख्याती असलेल्या देशमुख यांनी गर्भसंस्कार, नवजात शिशू आणि माता यांचा आहार या विषयावर महत्त्वाचे कार्य केले आहे. त्या शिव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयाच्या अधिष्ठात्या होत्या. १९९५ मध्ये त्यांची मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू म्हणून नियुक्ती झाली होती. आपल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी अनेक धडाडीचे आणि महत्त्वाचे निर्णय घेतले. त्यांतील एक महत्त्वाचा निर्णय म्हणजे विद्यापीठाच्या पदवी प्रमाणपत्रावर त्या विद्यार्थ्याच्या किंवा विद्यार्थिनीच्या आईचे नाव लिहिण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता.

हेही वाचा..

“अनिल देशमुखांनी दाखवलेल्या फडणीसांसोबतच्या फोटोला अर्थ नाही”

भारतीय युद्धनौका रशियन परेडमध्ये सामील, पुतीन यांनी मानले आभार !

खारघरमध्ये गोळीबार करत दागिन्यांच्या दुकानात दरोडा; लाखोंचे दागिने लुटले !

दिल्ली कोचिंग सेंटर दुर्घटनेनंतर नियमांचे उल्लंघन करणारे १३ कोचिंग सेंटर्स सील

गर्भसंस्कार तंत्र आणि मंत्र, तंत्रयुगातील उमलती मने, अरे संस्कार संस्कार इत्यादी ग्रंथसंपदा त्यांनी निर्माण केली आहे. त्यांना ‘डॉ. बी. सी. रॉय पुरस्कार’, ‘धन्वंतरी पुरस्कार’ मिळाले होते.

Exit mobile version