24 C
Mumbai
Wednesday, December 25, 2024
घरविशेषराष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक, माजी सहसरकार्यवाह, अभाविपचे संघटन मंत्री मदनदास देवी यांचे...

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक, माजी सहसरकार्यवाह, अभाविपचे संघटन मंत्री मदनदास देवी यांचे निधन

वयाच्या ८१ व्या वर्षी प्राणज्योत मालवली

Google News Follow

Related

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक, माजी सहसरकार्यवाह आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे माजी संघटन मंत्री मदनदास देवी यांचे सोमवार, २४ जुलै रोजी पहाटे बंगळुरू येथे वृद्धापकाळाने निधन झाले. वयाच्या ८१ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली आहे.

मदन दास देवी हे गेल्या अनेक दिवसांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे घरीच होते. वर्षभरापूर्वी त्यांच्यावर हरिद्वार येथील पालमपूरच्या आयुर्वेद संस्थेत पंचकर्म आणि इतर उपचारही करण्यात आले. दरम्यान, त्यांच्या पार्थिवावर मंगळवार, २५ जुलै रोजी सकाळी ११ वाजता पुण्यात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. मदनदास देवींनी त्यांच्या बालपणापासूनच त्यांचे आयुष्य राष्ट्रसेवा आणि संघकार्यात घालवले असून त्यांनी आयुष्यातील जवळपास ७० वर्ष संघाच्या प्रचारासाठी काम केले. संघापासून ते भाजपासाठी ते राजकीय निरीक्षक म्हणूनही ते कार्यरत होते. अरूण जेटली, अनंत कुमार, सुशिल मोदी, शिवराज सिंग चव्हाण, धर्मेंद्र प्रधान, विनोद तावडे अशा अनेक भाजपाच्या बड्या नेत्यांनी त्यांच्याकडून समाजकार्य संघटनेचे शिक्षण घेतले आहे.

हे ही वाचा:

पत्नी आणि पुतण्यावर गोळी झाडून सहाय्यक पोलीस आयुक्तांची आत्महत्या

मणिपूर: विवस्त्र धिंडीचा व्हिडीओ काढण्यासाठी वापरण्यात आलेला फोन पोलिसांच्या हाती

इराणकडून स्वीडन आणि डेन्मार्कमधील उत्पादनांवर बहिष्काराचे आवाहन

मणिपूरमधील हिंसाचार चिघळला; दंगलखोरांनी शाळा पेटवली

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून श्रद्धांजली 

मदनदास देवी यांच्या निधनाने खूप दुःख झाले असून त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य देशसेवेसाठी समर्पित केले. माझा त्यांच्याशी जवळचा सहवास तर होताच, पण त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळाले. या दुःखाच्या वेळी त्यांच्या कुटुंबियांना ईश्वर शक्ती देवो, अशा भावना नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केल्या आहेत.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी वाहिली श्रद्धांजली

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक आदरणीय मदनदास देवी यांच्या निधनाची बातमी ऐकून दु:ख झाल्याचे नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. विद्यार्थी जीवनापासून मदन दास यांच्यासोबत काम करण्याची आणि त्यांच्याकडून संघटन कौशल्ये शिकण्याची संधी मिळाली. चार्टर्ड अकाऊंटंटमध्ये सुवर्णपदक मिळाल्यानंतरही त्यांनी संघाचे प्रचारक म्हणून स्वत:ला देश आणि समाजासाठी समर्पित करत आपले काम सुरू केले. स्टुडंट कौन्सिलच्या माध्यमातून त्यांनी देशातील कोट्यवधी युवकांना प्रेरणा दिली, असे नितीन गडकरी म्हणाले. त्यांच्या निधनाने देशाने एक दिग्गज गमावला आहे. ईश्वर दिवंगत आत्म्याला शांती देवो, अशा भावना त्यांनी ट्वीट करून व्यक्त केल्या आहेत.

 

मदनदासजी यांचे कार्य अभाविप स्थापना दिनी म्हणजेच ९ जुलै रोजी मदनदासजी देवी यांचा जन्म. मदनदासजी यांचे मूळ गाव सोलापूर जिल्ह्यातील करमाळा. शालेय शिक्षणानंतर उच्च शिक्षणासाठी पुण्यातील BMCC कॉलेज येथे १९५९ ला प्रवेश, एम कॉमनंतर आयएलएस कॉलेजमध्ये गोल्ड मेडल पदकासह LLB. राष्ट्रीय स्तरावर उत्तम कामगिरी करत सीए शिक्षण पूर्ण केले होते. पुण्यात शिक्षण घेत असताना वरिष्ठ बंधू खुशालदास देवी यांच्या प्रेरणेने संघात दैनंदिन शाखेतील स्वयंसेवक, तत्कालीन संघाचे पदाधिकारी प्रल्हाद अभ्यंकर व अन्य अधिकारी वर्ग यांच्याशी वैचारिक चर्चा,संघ परीवारातील विविध आयामाविषयी विस्तारित सल्ला मसलत,अनेक पैलूंवर विचारधारेची स्पष्टता घेत राष्ट्रीय पुननिर्माणाच्या व्यापक संदर्भात संघ कार्यास समर्पित जीवनास सुरुवात. १९६९ पासून संघ प्रचारक. १९७५ पासून अभाविप आयामात जबाबदारी. अभाविप विभाग, प्रदेश,क्षेत्रीय या जबाबदारी नंतर अ. भा. संघटन मंत्री. पूर्ण देशभरात तालुका- महाविद्यालय- शहर स्तरावर संस्कारित कार्यकर्ता समूह उभा राहील यासाठी विशेष लक्ष देत अभाविपला नावाप्रमाणे अखिल भारतीय स्तरावर नेण्यात महत्त्वाचे योगदान. पायाला भिंगरी लावल्यागत सतत प्रवास करीत देशभरात अनेक समर्पित कार्यकर्त्यांची फळी उभी केली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा