आरजी कार हॉस्पिटलच्या माजी प्राचार्यांकडून बेवारस ‘मृतदेहांची विक्री’

रुग्णालयाचे माजी उपअधीक्षक अख्तर अली यांचा दावा

आरजी कार हॉस्पिटलच्या माजी प्राचार्यांकडून बेवारस ‘मृतदेहांची विक्री’

कोलकाता बलात्कार-हत्या प्रकरणाबाबत संपूर्ण देशात संताप व्यक्त होत आहे. याविरोधात लोक रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. या प्रकरणी आरजी कार हॉस्पिटलचे माजी प्राचार्य संदीप घोष यांची देखील चौकशी सुरु आहे. दरम्यान, रुग्णालयाचे माजी उपअधीक्षक अख्तर अली यांनी एका मुलाखतीदरम्यान माजी प्राचार्य संदीप घोष यांच्याबाबत अनेक धक्कादायक दावे केले आहेत. कोलकाता बलात्कार-हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी संजय रॉय हा यापूर्वी प्राचार्य संदीप घोष यांच्या सुरक्षेचा भाग असून तो त्यांचा बॉडीगार्ड होता, असा आरोप अख्तर अली यांनी केला आहे.

इंडिया टुडे टीव्हीला दिलेल्या विशेष मुलाखतीत अख्तर अली यांनी अनेक खळबळजनक आरोपही केले आहेत. ते म्हणाले की, बेकायदेशीर कामांव्यतिरिक्त संदीप घोष हे बेवारस मृतदेहांची विक्री करायचे. बायोमेडिकल वेस्ट वस्तू आणि वैद्यकीय उपकरणांची तस्करी देखील त्यांच्याकडून होत असल्याचे अख्तर अली यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, याबाबत दक्षता समितीकडे तक्रार करण्यात आली होती. या प्रकरणाच्या तपासातही त्यांचा सहभाग होता. अली यांनी दावा केला की, डॉ घोष यांच्या विरोधात राज्य आरोग्य विभागाकडे चौकशी अहवाल सादर केला होता. परंतु त्याच दिवशी आरजी कार हॉस्पिटलमधून माझी बदली करण्यात आली. ते म्हणाले, “ज्या दिवशी मी चौकशी अहवाल सादर केला, त्याच दिवशी माझी बदली झाली. या समितीतील इतर दोन सदस्यांचीही बदली झाली. या माणसापासून विद्यार्थ्यांना वाचवण्यासाठी मी जे काही करता येईल ते केले, पण मला अपयश आले. मात्र, प्राचार्य डॉ. संदीप घोष यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नसल्याचे त्यांनी सांगितले.

हे ही वाचा :

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे बॅनर आंदोलनात कसे काय झळकले?

सावधान… राजकीय गिधाडे सरसावली बलात्काराच्या वणव्यात हात शेकण्यासाठी!

युवराज सिंगचा क्रिकेट प्रवास मोठ्या पडद्यावर

‘बदलापूरच्या आरोपीचं वकीलपत्र घेऊ नका’

दरम्यान, हत्या प्रकरणानंतर प्राचार्य डॉ. संदीप घोष यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. विशेष म्हणजे राजीनाम्याच्या काही तासांतच सरकारकडून त्यांना कलकत्ता मेडिकल कॉलेजमध्ये नियुक्ती देण्यात आली होती. मात्र, यावरून कोलकाता उच्च न्यायालयाने सरकारवर ताशेरे ओढले आणि त्यानंतर घोष यांना अनिश्चित काळासाठी रजेवर पाठवण्यात आले.

Exit mobile version