दिल्लीतील राजघाटावर बनणार माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे स्मारक!

केंद्राने दिली मंजुरी, शर्मिष्ठा मुखर्जी यांनी पंतप्रधान मोदींचे मानले आभार

दिल्लीतील राजघाटावर बनणार माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे स्मारक!

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे स्मारक दिल्लीत बांधले जाणार आहे. राष्ट्रीय समिती संकुलात प्रणव मुखर्जी यांचे स्मारक उभारण्यासाठी केंद्र सरकारने जागा मंजूर केली आहे. प्रणव मुखर्जी यांची कन्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनी सोशल मीडियावर पोस्टकरत याची माहिती दिली. या निर्णयाबद्दल शर्मिष्ठा मुखर्जी यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान मोदींचे आभार मानले आहेत.

पंतप्रधान मोदींची भेट घेतल्यानंतर शर्मिष्ठा मुखर्जी यांनी ट्वीटरवर लिहिले, ‘मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले. माझ्या बाबांचे (प्रणव मुखर्जी) स्मारक बांधण्याचा निर्णय घेतल्याबद्दल त्यांचे आणि त्यांच्या सरकारचे मनःपूर्वक आभार. बाबांचे स्मारक बांधण्यासाठी आमच्या बाजूने किंवा इतर कोणीही सरकारकडे मागणी केलेली नव्हती. पंतप्रधानांच्या या दयाळूपणाने मी खूप प्रभावित झाले आहे, असे शर्मिष्ठा मुखर्जी यांनी म्हटले.

हे ही वाचा : 

महापालिका निवडणूक; ठाकूर कंपनीचे साम्राज्य खालसा होणार?

‘आप’ माजी जिल्हाध्यक्ष महमूद खानला बलात्कार, धर्मांतरण प्रकरणी अटक

सदस्य नोंदणीसाठी भाजपाचे १० जानेवारी रोजी ‘घर चलो अभियान’ 

सलमान खान आता राहणार बुलेटप्रूफ काचेत

दरम्यान, प्रणव मुखर्जी जुलै २०१२ ते २०१७ पर्यंत भारताचे १३ वे राष्ट्रपती होते. राष्ट्रपती म्हणून निवडून येण्यापूर्वी प्रणव मुखर्जी हे २००९ ते २०१२ पर्यंत अर्थमंत्री होते. २०१९ मध्ये त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ३१ ऑगस्ट २०२० रोजी वयाच्या ८४ व्या वर्षी त्यांचे निधन झाले.

Exit mobile version