इम्रान खान यांना आणखी १४ वर्षांची शिक्षा, यावेळी पत्नीही शिक्षेस पात्र!

प्रत्येकी ७८ कोटी पाकिस्तानी रुपयांचा दंड

इम्रान खान यांना आणखी १४ वर्षांची शिक्षा, यावेळी पत्नीही शिक्षेस पात्र!

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान आणि त्यांची पत्नी बुशरा बीबी मोठ्या संकटात सापडले आहेत. तोषखाना प्रकरणात दोघांनाही १४ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पाकिस्तानच्या जिओ न्यूजच्या रिपोर्टनुसार, इम्रान खान आणि त्यांच्या पत्नीला १४ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावणीत आली आहे.

न्यायालयाने इम्रान खान आणि त्यांच्या पत्नीला १० वर्षांसाठी सार्वजनिक पदावर राहण्यास मनाई केली आहे.तसेच दोघांनाही प्रत्येकी ७८ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.इम्रान खान यांना सलग दोन दिवसांत हा दुसरा धक्का आहे.

हे ही वाचा:

“लोकशाही मूल्यांचे वस्त्रहरण करणाऱ्या खासदारांनी शेवटच्या सत्रात आत्मपरिक्षण करावं”

क्रिकेटपटू मयांक अगरवाल विमानातच पडला आजारी!

छत्तीसगड: नक्षलवाद्यांचा सीआरपीएफ कॅम्पवर हल्ला, ३ जवान हुतात्मा १४ जखमी!

मंदिर पिकनिक स्पॉट नाही; ध्वजस्तंभाच्या आत हिंदू नसणाऱ्यांनी प्रवेश करु नये

या आधी मंगळवार ३० जानेवारी रोजी इम्रान खान यांना सिफर प्रकरणात १० वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती.इम्रान खान यांच्यासह या प्रकरणी माजी परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी यांनाही दहा वर्षाची शिक्षा ठोठावण्यात आली.पाकिस्तानच्या रावळपिंडी येथील अडियाला तुरुंग न्यायालयाचे न्यायाधीश मोहम्मद बशीर यांनी तोशखाना प्रकरणी शिक्षा सुनावली.मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणाच्या संपूर्ण सुनावणीदरम्यान इम्रान खान यांची बुशरा बीबी न्यायालयात हजर नव्हत्या.

तोशखाना प्रकरण नेमके काय?
दरम्यान, तोशखाना हे पाकिस्तानधील एका शासकीय विभागाचे नाव आहे.जेव्हा इम्रान खान बाहेरील देशाला भेट देत असत तेव्हा त्या देशाच्या प्रतिनिधींकडून भेट स्वरुपात महागड्या वस्तू देत असत.या सर्व महागड्या भेटवस्तू तोशखाना विभागात जमा कराव्या लागत असत.पंरतु, या मिळालेल्या मौल्यवान भेटवस्तू इम्रान खान यांनी कमी पैशात विकून पैसे मिळविल्याचे आयोप आहे.

 

Exit mobile version