तुरुंगात असलेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान पक्षाच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवणार नाहीत.त्यांच्या जागी त्यांनी बॅरिस्टर गौहर खान यांना तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय)च्या अध्यक्षपदासाठी उमेदवारी दिली आहे,जे आगामी सार्वत्रिक निवडणुकीत पक्षाचे नेतृत्व करतील. असे बुधवारी एका वरिष्ठ नेत्याने उघड केले.
डॉनने दिलेल्या बातमीनुसार, पीटीआयचे बॅरिस्टर अली जफर यांनी बुधवारी जाहीर केले की अध्यक्ष इम्रान खान त्यांच्या कायदेशीर अडचणींमुळे २ डिसेंबर शनिवार रोजी होणाऱ्या पक्षाच्या निवडणुका लढवणार नाहीत. यावेळी त्यांनी बॅरिस्टर गोहर खान यांना पक्षाध्यक्षपदासाठी उमेदवारी दिल्याचेही जाहीर केले.एक दिवस आधी वरिष्ठ उपाध्यक्ष शेर अफजल मारवत यांनी बॅरिस्टर गौहर खान पीटीआयच्या अध्यक्षपदासाठी उमेदवार असतील असे सांगितले होते. त्यांच्या या वक्तव्यावर वाढता गदारोळ पाहून इम्रान खान यांचा आपल्या पदाचा राजीनामा देण्याचा कोणताही विचार नसल्याचा दावा पीटीआयने केला आहे. मात्र बॅरिस्टर अली जफर यांच्या वक्तव्यानंतर आगामी निवडणुकीत इम्रान खान पीटीआयची सूत्रे हाती घेणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
हे ही वाचा:
पाकिस्तानात लग्न करून बनलेली फातिमा पुन्हा भारतात अंजु बनून परतली!
बोगद्यात अडकलेल्या ४१ मजुरांसाठी देवदूत बनलेल्या प्रत्येक कर्मचाऱ्याला ५० हजारांचा भत्ता
मुंबई पोलिसांच्या ‘लिओ’ श्वानाने अपहरण झालेल्या मुलाला काढले शोधून!
अजानसाठी लाऊडस्पीकर वापरल्याने ध्वनी प्रदूषण होत नाही, गुजरात उच्च न्यायालय!
बुधवारी पत्रकारांशी बोलताना जफर म्हणाले की, तोशाखाना भेटवस्तू घोषित करण्यात अयशस्वी झाल्यास एखाद्या व्यक्तीला अपात्र ठरवता येणार नाही. मात्र पक्ष सावधपणे पुढे जात आहे. इम्रानच्या तोशखान्याच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आली असली तरी अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही, असे ते म्हणाले. या सर्व बाबींवर इतर वकिलांच्या उपस्थितीत इम्रान यांच्याशी चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. आगामी सार्वत्रिक निवडणुकीत पक्षाला बॅट चिन्ह न देण्यासाठी, उमेदवारांचे नामांकन नाकारणे किंवा निवडणुकीत भाग न घेतल्याबद्दल ईसीपीला कोणतीही सबब द्यायची नाही, असे त्यांनी इम्रानचे म्हणणे उद्धृत केले.
अली जफर यांनी इम्रानचा हवाला देत म्हणाले की, “जनता आमच्यासोबत आहे. जेव्हा निवडणुका होतील तेव्हा आम्ही जिंकू.पक्षांतर्गत मतदानाला माझ्यासाठी काहीच अर्थ नाही. तोशाखाना प्रकरणाचा निकाल लवकरात लवकर यावा, अशी माझी इच्छा आहे.जेव्हा निर्णय होईल तेव्हा, मी अध्यक्ष म्हणून पक्षांतर्गत निवडणूक लढवणार आहे.