कतारमधील एका कंपनीत काम करत असताना कतारने ऑगस्ट २०२२ मध्ये इस्रायलसाठी हेर म्हणून काम केल्याच्या संशयावरून भारताच्या आठ माजी नौदल अधिकाऱ्यांना ताब्यात घेतले होते. कतारने या नौदल अधिकाऱ्यांना एका वर्षाहून अधिक काळ नजरकैदेत ठेवण्यात आले होते. त्यानंतर कतारमधील एका न्यायालयाने गुरुवारी या आठ माजी भारतीय नौदलाच्या कर्मचार्यांना फाशीची शिक्षा ठोठावली आहे. या निकालावर भारताने प्रतिक्रिया दिली की, भारत सरकारला अत्यंत धक्का बसला असून शक्य होईल तेवढ्या लवकर कायदेशीर कारवाईसाठी प्रयत्न करणार आहोत.
“आम्हाला फाशीच्या शिक्षेच्या निर्णयामुळे खूप धक्का बसला आहे आणि आम्ही तपशीलवार निकालाची वाट पाहत आहोत. आम्ही कुटुंबातील सदस्य आणि कायदेशीर टीमच्या संपर्कात आहोत आणि आम्ही सर्व कायदेशीर पर्यायांचा शोध घेत आहोत,” असे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने (MEA) म्हटले आहे.”आम्ही या खटल्याला खूप महत्त्व देतो, आणि त्याचे बारकाईने पालन करत आहोत. आम्ही सर्व कॉन्सुलर आणि कायदेशीर मदत देणे सुरू ठेवू. आम्ही कतारी अधिकार्यांकडेही निर्णय घेऊ,” असेही त्यात म्हटले आहे.तथापि, परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने आपल्या निवेदनात गोपनीय राखत या क्षणी अधिक भाष्य करण्यास नकार दिला.
हे ही वाचा:
अमेरिकेत बंदुकधाऱ्याच्या अंदाधुंद गोळीबारात २२ ठार
शहीद अग्निवीर अक्षय गवतेंच्या कुटुंबियांना शिंदे सरकारकडून मदत जाहीर
जितेंद्र आव्हाडांचे ड्रग्स तस्करांशी संबंध?
NCERT च्या नव्या पुस्तकांमध्ये ‘इंडिया’ ऐवजी ‘भारत’
शिक्षा झालेले आठ माजी भारतीय नौदल अधिकारी कतारमधील एका कंपनीत काम करत होते. इस्रायलसाठी हेर म्हणून काम केल्याच्या संशयावरून या आठ माजी भारतीय नौदलाच्या अधिकाऱ्यांना ऑगस्ट २०२२ मध्ये ताब्यात घेण्यात आले.अटक करण्यात आलेले आठ माजी भारतीय नौदल अधिकारी – कॅप्टन नवतेज सिंग गिल, कॅप्टन बिरेंद्र कुमार वर्मा, कॅप्टन सौरभ वसिष्ठ, कमांडर अमित नागपाल, कमांडर पूर्णेंदू तिवारी, कमांडर सुगुनाकर पकाला, कमांडर संजीव गुप्ता आणि नाविक रागेश यांचा समावेश आहे. कतारच्या गुप्तचर संस्थेने या अधिकाऱ्यांना ३ ऑगस्ट २०२२ रोजी दोहा येथून अटक केली होती.
या प्रकरणी नौदलाच्या अधिकाऱ्यांची जामीन याचिका कतारी अधिकाऱ्यांनी अनेकदा फेटाळल्या.आदल्या दिवशी कतारच्या फर्स्ट इन्स्टन्स कोर्टाने फाशीची शिक्षा जाहीर केली.मीडिया रिपोर्ट्सनुसार, इस्रायलच्या वतीने पाणबुडी संबंधित कार्यक्रम सादर करण्यात आला होता.यामध्ये या आठ भारतीय अधिकाऱ्यांनी कार्यक्रमाशी संबंधित हेरगिरी केली.कतारी अधिकाऱ्यांनी असाही दावा केला आहे की त्यांच्याकडे या प्रकरणाशी संबंधित इलेक्ट्रॉनिक पुरावे आहेत.